मुंबई, 30 मार्च : पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) टीमने आयपीएल 2021 (IPL 2021) जिंकण्यासाठी टीमच्या नावासोबतच खेळाडूही बदलले. यानंतर आता प्रिती झिंटाच्या टीमने नवी जर्सीही लॉन्च केली. सोशल मीडियावर पंजाब किंग्सने त्यांच्या जर्सीचं अनावरण केलं, पण या जर्सीचं कौतुक होण्याऐवजी चाहत्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली. तसंच पंजाबने जर्सी कॉपी केल्याचा आरोपही केला.
पंजाब किंग्सची नवी जर्सी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) जर्सीसारखीच दिसत आहे. याआधी पंजाबची जर्सी लाल आणि चंदेरी रंगाची असायची, पण आता त्यांची नवी जर्सी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या जुन्या जर्सीसारखीच आहे.
पंजाबची ही जर्सी पाहून चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. पंजाब किंग्स आता आरसीबीचा दुसरा भाग आहे. पंजाबच्या टीममध्ये याआधी बँगलोरकडून खेळणारे 9 खेळाडू आहेत, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या.
आयपीएलच्या या मोसमाची सुरूवात 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. तर पंजाबची टीम 12 एप्रिलला त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगेल.
पंजाबने मंगळवारी ट्वीटरवर टीमच्या नव्या जर्सीचा व्हिडिओ शेयर केला. या व्हिडिओमध्ये कर्णधार केएल राहुल याचं नाव असलेली जर्सी दिसत आहे. नव्या जर्सीच्या डाव्या बाजूला टीमचा लोगो आहे आणि आतमध्ये टीमचं नाव आहे. तसंच डरकाळी फोडणाऱ्या सिंहाचंही चित्र आहे. कॉलर आणि खांद्यावर सोनेरी रंगाची पट्टी आहे, तसंच हेल्मेटचा रंगही सोनेरीच आहे. केकेआर आणि बँगलोरचे खेळाडूही याच रंगाचं हेल्मेट वापरतात.
पंजाबची टीम
केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकांदे, रवी बिश्णोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत बरार, इशान पोरेल, डेविड मलान, जाय रिचर्डसन, शाहरुख खान, राइली मेरिडिथ, मोइजेज हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फैबियन एलन, सौरभ कुमार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, Punjab kings, RCB