IPL 2021: सतत फ्लॉप होऊनही Maxwell ला इतके पैसे का मिळतात? गंभीरनं सांगितलं कारण

IPL 2021: सतत फ्लॉप होऊनही Maxwell ला इतके पैसे का मिळतात? गंभीरनं सांगितलं कारण

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा गेल्या काही आयपीएल सिझनमध्ये सातत्यानं फ्लॉप ठरला आहे. या खराब कामगिरीनंतरही मॅक्सवेलचा भाव काही कमी झालेला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल: ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा गेल्या काही आयपीएल सिझनमध्ये सातत्यानं फ्लॉप ठरला आहे. या खराब कामगिरीनंतरही मॅक्सवेलचा भाव काही कमी झालेला नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2021 Auction) मॅक्सवेलला तब्बल 14.25 कोटी मोजून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) खरेदी केलं आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) मॅक्सवेलला दरवर्षी चांगली किंमत का मिळते? याचं कारण सांगितलं आहे.

गंभीरनं 'इएसपीएन क्रिकइन्फो' या वेबसाईटबद्दल सांगितलं की,"खरं सांगायचं तर मॅक्सवेलनं चांगला खेळ केला असता तर तो आयपीएलमध्ये इतक्या टीमकडून खेळला नसता. तो इतक्या टीममध्ये खेळला आहे कारण त्याच्यामध्ये सातत्य नाही. त्याला मागच्या टीममध्ये खेळण्याचं स्वातंत्र्य नव्हतं असं नेहमी सांगितलं जातं. तो दिल्लीकडून खेळला त्यावेळी तर त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं. त्याच्यातील 'एक्स फॅक्टर' मुळे अनेक टीम आणि त्यांचे कोच मॅक्सवेलची निवड करतात." असं स्पष्टीकरण गंभीरनं दिलं आहे.

गंभीर पुढे म्हणाला की, "2014 चा अपवाद वगळता मॅक्सवेलनं कधीही खास प्रदर्शन केलेलं नाही. त्यानं चांगला खेळ केला असता तर कोणत्याही टीमनं त्याला सोडलं नसतं. तुम्ही आंद्रे रसेलला (Andre Russell) पाहा त्यानं कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून कसा खेळला आहे. त्यामुळेच तो केकेआरचा महत्त्वाचा सदस्य आहे.

IPL 2021: 'या' परिस्थितीमध्येच स्मिथ दिल्लीकडून खेळेल, पॉन्टिंगचं स्पष्टीकरण )

तुम्ही चांगला खेळ केला नाही तरच तुम्हाला एखादी टीम रिलीज करते. तुम्ही इतक्या टीमकडून खेळला याचाच अर्थ आहे की तुमच्यात सातत्य नाही. मॅक्सवेलला जास्त पैसे मिळतात कारण ऑस्ट्रेलियाकडून त्याची कामगिरी चांगली झालेली आहे. मला वाटतं की आरसीबीचा विचार केला तर यावर्षी तो चांगली कामगिरी करेल,"  असे गंभीरने सांगितले.

Published by: News18 Desk
First published: April 7, 2021, 3:21 PM IST

ताज्या बातम्या