मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू होणार निवृत्त!

IPL 2021: आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू होणार निवृत्त!

आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2021) गेली दीड दशकं क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूनं आयपीएल स्पर्धेनंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कोच होण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2021) गेली दीड दशकं क्रिकेटचं मैदान गाजवणारा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) निवृत्त होणार आहे. हरभजननंच त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. हरभजननं 1998 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 41 वर्षांचा भज्जी हा इम्रान ताहीर (Imran Tahir) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांच्यानंतरचा आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाचा सिनिअर खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातही हरभजन एक यशस्वी बॉलर आहे. त्यानं  163 मॅचमध्ये 150 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच त्याचा इकॉनामी रेट 7.07 आहे.

हरभजननं 2013, 2015 आणि 2017  साली मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्याशिवाय 2018 साली आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचाही (Chennai Super Kings) तो सदस्य होता. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या मॅचनंतर बोलताना हरभजननं निवृत्तीचे संकेत दिले.

'मला जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. मी देशांतर्गत क्रिकेटही फारसं खेळत नाही. त्यामुळे मी इथून पुढे खेळणार की नाही हे मला माहिती नाही. पण, मला केकेआर टीममध्ये तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात मजा आली. क्रिकेट माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मी भारतीय क्रिकेट किंवा आयपीएलची सेवा करत राहीन. कोच किंवा मेंटॉर म्हणून टीमची मदत करू शकतो.'

IPL 2021 : मुंबईचं आयपीएल हॅट्रिकचं स्वप्न भंगलं, राजस्थानने KKR समोर गुडघे टेकले!

हरभजननं यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2021 Auction) नाव नोंदवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याला केकेआरनं 2 कोटींच्या बेस प्राईजला खरेदी केले होते. तो यावर्षा केकेआरकडून फक्त तीन मॅच खेळला, मात्र त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

IPL 2021: टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी Good News, विराटचा 'हा' सहकारी जबरदस्त फॉर्मात

हरभजननं 2020 साली वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सनं त्याला रिलीज केले. त्यानं आजवर निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, 2016 नंतर त्यानं टीम इंडियाकडून एकही मॅच खेळलेली नाही. हरभजनचा फ्रेंडशिप हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021