मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Playoffs: ....तर हैदराबाद विरुद्ध एकही बॉल न खेळता मुंबई इंडियन्स होणार आऊट!

IPL 2021 Playoffs: ....तर हैदराबाद विरुद्ध एकही बॉल न खेळता मुंबई इंडियन्स होणार आऊट!

कोलकाता नाईटर रायडर्सनं (KKR) गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) 86 रननं मोठा पराभव केला आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) केकेआरच्या विजयानं मोठा धक्का बसला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर: कोलकाता नाईटर रायडर्सनं  गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) 86 रननं मोठा पराभव केला आहे.कोलकाताच्या या विजयानं त्यांची प्ले ऑफमधील जागा (IPL 2021 Playoffs) जवळपास निश्चित झाली आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) केकेआरच्या विजयानं मोठा धक्का बसला. आता टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिल्यांदा बॅटींग करुन  200 पेक्षा जास्त स्कोअर करावा लागेल, यानंतर मुंबईला हैदराबादवर किमान 171 रनने विजय मिळवणे आवश्यक आहे.  शुक्रवारच्या मॅचमध्ये हैदराबादचा (SRH) कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली तर मात्र मॅचमधील पहिला बॉल पडण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल आणि केकेआर अधिकृतपणे 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश करेल.

मुंबई इंडियन्सची पहिल्यांदा बॉलिंग आली तर रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम केकेआरला मागं टाकू शकत नाही. मुंबईनं अगदी पहिल्या ओव्हरमध्ये विजय मिळवला तरी ते शक्य होणार नाही. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेली मुंबई 12 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पण त्यांचा रनरेट -0.048 आहे. तर केकेआरनं राजस्थानवर मोठा विजय मिळवत त्यांचा रनरेट +0.587 इतका भक्कम केला आहे. मुंबईला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात जोरदार संघर्ष करावा लागला. त्याचा फटका टीमला बसला आहे.

POINTS TABLE:

प्ले-ऑफमध्ये मुंबईचा प्रवेश होण्यासाठी या सामन्यात राजस्थानने कोलकात्याला हरवणं आणि मग शुक्रवारी मुंबईने हैदराबादचा (SRH) पराभव करणं गरजेचं होतं, पण राजस्थानने कोलकात्यासमोर गुडघे टेकल्यामुळे मुंबईच्या स्वप्नांना धक्का बसला. कोलकातल्याच्या या विजयामुळे फक्त मुंबईच नाही तर पंजाबचंही प्ले-ऑफला पोहोचता येणार नाही. कोलकात्याने दिलेल्या 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला फक्त 85 रनपर्यंतच मजल मारता आली.

IPL 2021: आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू होणार निवृत्त!

'प्ले ऑफ'च्या टीम ठरल्या

या सामन्यासोबतच आयपीएल प्ले-ऑफच्या आता चारही जवळपास निश्चित झाल्या आहेत. दिल्ली, चेन्नई, आरसीबी आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई राहणार का आरसीबी याचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या मॅचनंतर होणार आहे. प्ले-ऑफमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या टीमना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोनवेळा संधी मिळते.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians