Home /News /sport /

IPL 2021 Final: KKR घेणार मोठा निर्णय, कॅप्टन मॉर्गनची होणार टीममधून हकालपट्टी!

IPL 2021 Final: KKR घेणार मोठा निर्णय, कॅप्टन मॉर्गनची होणार टीममधून हकालपट्टी!

वर्ल्ड कप विजेता कॅप्टन मॉर्गननं (Eoin Morgan) या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) सपशेल निराशा केली आहे. मॉर्गननं या आयपीएलधील 16 मॅचमध्ये फक्त 129 रन केले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 11.72 असून स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर:  आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) मॅच आज (शुक्रवारी) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर घसरलेल्या केकेआरनं (KKR) या स्पर्धेत जबरदस्त कमबॅक करत फायमलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये त्यांची लढत तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या सीएसकेशी (CSK) होणार आहे. कोलकाताचा कॅप्टन इयन मॉर्गनची (Eoin Morgan) या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर फायनलमध्ये केकेआर मॉर्गनशिवाय उतरेल असा खळबळजनक दावा इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) यानं केला आहे. वॉननं 'क्रिकबझ' शी बोलताना हा दावा केला आहे. वॉननं यावेळी सांगितलं की, 'मॉर्गननं स्वत:चा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला नाही तर मला आश्चर्य वाटणार नाही. मॉर्गनच्या जागेवर आंद्रे रसेलचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.' रसेल दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहे. पण, तो आता फिट झाला आहे. त्यानं बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीची नेट प्रॅक्टीस केली आहे. IPL 2021 Final Live Streaming: KKR vs CSK फायनल कधी आणि कुठे पाहता येणार? इंग्लंडचा माजी कॅप्टन पुढे म्हणाला की, 'केकेआरला पिचनुसार निर्णय घ्यावा लागेल. कारण, कोलकातानं आत्तापर्यंत शारजाहमध्ये सामने खेळले आहेत. तेथील परिस्थिती त्यांना अनुकूल होती. दुबईतील परिस्थिती वेगळी आहे. आंद्रे रसेल जर 4 ओव्हर टाकू शकत असेल तर शाकीब अल हसनला बाहेर बसावं लागेल. डावखुऱ्या स्पिनरला बाहेर बसवणं किती योग्य असेल? त्यामुळे मॉर्गन स्वत:ला बाहेर बसवू शकतो. कारण, तो नेहमी टीमच्या फायद्याचा निर्णय घेतो.' ORANGE CAP: वर्ल्ड कप विजेता कॅप्टन मॉर्गननं या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) सपशेल निराशा केली आहे. मॉर्गननं या आयपीएलधील 16 मॅचमध्ये फक्त 129 रन केले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 11.72 असून स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी आहे. एकाच आयपीएल सिझनमध्ये 4 वेळा शून्यावर आऊट झालेला तो पहिला कॅप्टन आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्येही तो शून्यावर आऊट झाला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या