दुबई, 11 ऑक्टोबर : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हे फक्त नाव नाही, तर इमोशन आहे, याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. आयपीएल स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (Chennai Super Kings vs Delhi Capitals) 4 विकेट्सनं पराभव केला. या विजयात धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेले फटकेबाजीचा मोठा वाटा होता. जगातील बेस्ट फिनिशर समजल्या जाणऱ्या धोनीची बॅट या आयपीएलमध्ये शांत होती. सीएसकेची टीम (CSK) चांगली खेळत असताना धोनीला रन काढण्यासाठी झगडताना पाहणे हा फॅन्ससाठी त्रासदायक अनुभव होता. सोमवारी धोनी जुन्या अवतारात दिसताच फॅन्सच्या अश्रूंचा बांध थांबला नाही. धोनी बॅटिंगला आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 11 बॉलमध्ये 24 रनची गरज होती. बॅटिंगला आल्यानंतर 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला धोनीला स्ट्राईक मिळाला. पहिल्याच बॉलला धोनीने एकही रन काढली नाही, पण आवेश खानच्या पुढच्या बॉलला त्याने सिक्स मारली. यानंतर 19 व्या ओव्हरचा अखेरच्या बॉलवरही धोनीला रन काढण्यात यश आलं नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 13 रनची गरज होती आणि दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉम करनच्या हातात बॉल दिला. पहिल्याच बॉलला करनने मोईन अलीची विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलला धोनीने फोर मारली. दबावात आलेल्या करनने पुढचा बॉल वाईड टाकला, त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा फोर मारून चेन्नईला आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं. धोनी मैदानात फटकेबाजी करत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेली एक चिमुरडी खूपच इमोशनल झाली होती. तिनं चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घातली होती. चेन्नईची टीम जिंकत असलेलं पाहून ती अश्रू आवरु शकली नाही. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Hapieee Tears 😥😥#Dhoni #CSKvsDC pic.twitter.com/DcD650logS
— 亗 ᙖᎥᏀ ᠻꪖꪀ 𝖔𝖋 🆃🅷🅰🅻🅰 亗 (@Nj02_tweetz) October 10, 2021
MS Dhoni he is not just a cricketer, he is emotion for us 😭💛....#CSK #Yellove #WhistlePodu pic.twitter.com/sQKcn0hTUx
— Anu (@Anu_738) October 11, 2021
CSK is not a team, it's an emotion. In those moments when Mahi was hitting those shots, we all felt the same! 💛#CSKvsDC #Dhoni pic.twitter.com/3BMujo6mhY
— Laughter Corridor (@laughtercoridor) October 10, 2021
धोनी मॅच संपवून परतला, त्यावेळी त्याला या छोट्या फॅन्सबद्दल समजले. त्यावेळी धोनीनं तात्काळ त्या मुलीला मॅच जिंकलेला बॉल भेट म्हणून देत सर्वांचं मन जिंकलं.
Moment of the match Dhoni giving the ball to that girl who was earlier in tears of joy!!#CSKvsDC #DCvsCSK #Qualifier1 #Dhoni pic.twitter.com/dr9Xj0paWE
— Pushkar Pushp (@ppushp7) October 10, 2021
दिल्लीवरील विजयासह चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला अजूनही फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना बुधवारी होणारी क्वालिफायर 2 ची मॅच जिंकावी लागेल. IPL 2021 : 0,6,0,4,4,4, माही मार रहा है! 6 बॉलमध्येच धोनीने संपवला सामना