मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 0,6,0,4,4,4, माही मार रहा है! 6 बॉलमध्येच धोनीने संपवला सामना

IPL 2021 : 0,6,0,4,4,4, माही मार रहा है! 6 बॉलमध्येच धोनीने संपवला सामना

आयपीएल 2021 (IPL 2021 Qualifier 1) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचं (MS Dhoni) जुनं रुप पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळालं आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021 Qualifier 1) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचं (MS Dhoni) जुनं रुप पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळालं आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021 Qualifier 1) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचं (MS Dhoni) जुनं रुप पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळालं आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 10 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021 Qualifier 1) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचं (MS Dhoni) जुनं रुप पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (CSK vs DC) हातातोंडाशी आलेला विजयाचा घास धोनीने खेचून आणला आणि चेन्नईला 9 व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं. धोनीने 6 बॉलमध्ये नाबाद 18 रन केले. यात तीन फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

चेन्नईला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 24 रनची गरज होती, पण 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फॉर्ममध्ये असलेला आणि सेट झालेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 50 बॉलमध्ये 70 रन करून आऊट झाला होता. ऋतुराजची विकेट गेल्यानंतर फॉर्ममध्ये असलेला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) किंवा ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) बॅटिंगला येईल असं वाटत होतं, पण धोनी स्वत: मैदानात उतरला. धोनी बॅटिंगसाठी आलेला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, कारण या मोसमात त्याला संघर्ष करावा लागला आहे, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही कमी आहे.

तिसरी विकेट गेल्यानंतर धोनीने मोईन अली, अंबाती रायुडू, जडेजा आणि ब्राव्हो असतानाही शार्दुल ठाकूरला बॅटिंगसाठी पाठवलं, पण त्याची ही रणनिती फसली आणि ठाकूर पहिल्याच बॉलला आऊट झाला. धोनीने स्वत:ला बॅटिंगला पाठवण्याचा घेतलेला निर्णय मात्र अखेर बरोबर असल्याचं ठरवलं.

बॅटिंगला आल्यानंतर 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला धोनीला स्ट्राईक मिळाला. पहिल्याच बॉलला धोनीने एकही रन काढली नाही, पण पुढच्या बॉलला त्याने सिक्स मारली. यानंतर 19 व्या ओव्हरचा अखेरच्या बॉलवरही धोनीला रन काढण्यात यश आलं नाही.

अखेरच्या ओव्हरला चेन्नईला विजयासाठी 13 रनची गरज होती आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉम करनच्या हातात बॉल दिला. पहिल्याच बॉलला करनने मोईन अलीची विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलला धोनीने फोर मारली. दबावात आलेल्या करनने पुढचा बॉल वाईड टाकला, त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा फोर मारून चेन्नईला आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं.

दिल्लीने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. फाफ डुप्लेसिस 1 रनवर आऊट झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी दिल्लीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रॉबिन उथप्पा 44 बॉलमध्ये 63 रन करून आऊट झाला.

दिल्लीला पराभूत करून चेन्नईची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. तर दिल्लीच्या टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी आहे. आरसीबी आणि कोलकाता यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ते दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळतील. या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, MS Dhoni