मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: युजवेंद्र चहलला स्पर्धेतील पहिली विकेट मिळताच पत्नी धनश्री इमोशनल, पाहा PHOTO

IPL 2021: युजवेंद्र चहलला स्पर्धेतील पहिली विकेट मिळताच पत्नी धनश्री इमोशनल, पाहा PHOTO

आरसीबीचा मुख्य स्पिनर असलेल्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) पहिल्या दोन मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. चहलला केकेआरविरुद्ध पहिली विकेट मिळताच त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma इमोशनल झाली होती.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 19 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मधील 10 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झाली. या मॅचमध्ये आरसीबीनं केकेआरचा 38 रननं पराभव केला. हा आरसीबीचा सलग तिसरा विजय असून यामुळे त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर केकेआरचा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे.

आरसीबीचा मुख्य स्पिनर असलेल्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) पहिल्या दोन मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. अखेर तिसऱ्या मॅचमध्ये चहलला यश मिळालं. त्यानं केकेआरच्या विरुद्ध दोन विकेट्स घेतल्या. या मॅचमध्ये चहलला पहिली विकेट मिळताच त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) इमोशनल झाली होती.

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये चहलला एकही विकेट मिळाली नव्हती. रविवारी केकेआरविरुद्ध त्यानं जोरदार कमबॅक केलं. चहलनं चार ओव्हरमध्ये नितिश राणा आणि दिनेश कार्तिक या दोन महत्त्वाच्या बॅट्समनना आऊट केलं. या मॅचमध्ये त्यानं 8.50 च्या इकॉनॉमी रेटनं 34 रन दिले.

चहलनं पहिली विकेट घेताच इमोशनल झालेल्या धनश्रीचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला. त्यावेळी धनश्रीच्या डोळ्यात अश्रू आले होते. चहलनं नितिश राणाला आऊट करत या आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. राणानं त्यापूर्वी चहलला दोन सलग फोर लगावले होते. त्यानंतर तो देवदत्त पडिक्कलकडं कॅच देऊन आऊट झाला. चहलनं पुढच्याच ओव्हरमध्ये  दिनेश कार्तिकला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

टी20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत डीव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

चहलनं पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन दिले होते. त्याची शेवटची ओव्हर महागडी ठरली. त्या ओव्हरमध्ये 20 रन निघाले. आंद्रे रसेलनं एक सिक्स आणि तीन चौकार लगावत चहलची धुलाई केली. चहलनं या मॅचनंतर बोलताना सांगितलं की, "चांगली बॉलिंग केल्यानंतरही विकेट मिळत नसेल तर त्याचा त्रास होता.  पहिली विकेट मिळाल्यानंतर मी इमोशनल झालो होतो. मला आंद्रे रसलेला आऊट करायचं होतं. त्यामुळे मी फिल्डिंगमध्ये बदल केला होता."

First published:

Tags: Cricket, Ipl, IPL 2021, Photo, RCB, Yuzvendra Chahal