मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup 2021: टीम इंडियात निवड झाल्यानंतर अश्विन झाला इमोशनल, भावुक मेसेज केला शेअर

T20 World Cup 2021: टीम इंडियात निवड झाल्यानंतर अश्विन झाला इमोशनल, भावुक मेसेज केला शेअर

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये ऑफ स्पिनर आर. अश्विनचे (Ravichandran Ashwin) 4 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये ऑफ स्पिनर आर. अश्विनचे (Ravichandran Ashwin) 4 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये ऑफ स्पिनर आर. अश्विनचे (Ravichandran Ashwin) 4 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे.

मुंबई, 9 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीनं महेंद्र सिंह धोनीवर (MS Dhoni) मोठी जबादारी सोपवत त्याची टीमचा मेंटर म्हणून नियुक्ती केली आहे. तर ऑफ स्पिनर आर. अश्विनचे (Ravichandran Ashwin) 4 वर्षांनंतर टीममध्ये पुनरागमन झाले आहे. अश्विनचा टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी भारतीय बॉलर युजवेंद्र चहलच्या जागी समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियात निवड होताच अश्विननं इमोशनल मेसेज शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

अश्विननं 2017 साली त्याच्या घराच्या भिंतीवर लिहलेला प्रेरणादायी मेसेज फॅन्ससोबत शेअर केला आहे. अश्विननं ट्विट करत म्हंटलं आहे की, ‘माझ्या घराच्या भिंतीवर लिहण्याच्यापूर्वी या ओळी मी अनेकदा डायरीमध्ये लिहिल्या होत्या. ज्या ओळी आपण वाचतो, त्याने प्रभावित होतो त्यामध्ये मोठी शक्ती असते. आनंद आणि आभार.

काय आहे मेसेज?

अश्विनला 2017 साली टी 20 टीममधून वगळण्यात आले होते. त्यावेळी त्यानं भिंतीवर या प्रेरणादायी ओळी लिहिल्या होत्या. ‘प्रत्येक बोगद्याच्या शेवटी प्रकाश असतो. तो बोगद्यातील त्याच लोकांना दिसतो, ज्यांना प्रकाशावर विश्वास असतो.’

अश्विनचं T20 करिअर

अश्विन हा हुशार बॉलर म्हणून ओळखला जातो. त्याचा अनुभव टीम इंडियासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यानं आजवर 252 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये 249 विकेट्स घेतल्या आहेत.

T20 World Cup ची टीम नक्की कोणी निवडली? Virat Kohli ला पाच धक्के!

भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: Cricket news, R ashwin, T20 world cup