Home /News /sport /

IPL 2021, DC vs RR: पंत टाकणार सेहवागला मागं, दिल्लीसाठी करणार सर्वात मोठा रेकॉर्ड!

IPL 2021, DC vs RR: पंत टाकणार सेहवागला मागं, दिल्लीसाठी करणार सर्वात मोठा रेकॉर्ड!

आयपीएल 2021 मध्ये शनिवारी पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. ही मॅच दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishab Pant) याच्यासाठी महत्त्वाची आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : आयपीएल 2021 मध्ये शनिवारी पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. ही मॅच दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishab Pant) याच्यासाठी महत्त्वाची आहे. पंत या मॅचमध्ये वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) दिल्लीसाठी केलेला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमसाठी सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड  हा वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागनं 2008 ते 2013 या काळात दिल्लीसाठी आयपीएल खेळले. या काळात त्यानं 85 इनिंगमध्ये 2382 रन काढले आहेत. यामध्ये 1 शतक आणि 17 अर्धशतकाचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 158.77 तर सरासरी 29.77 इतकी आहे. पंतला राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये सेहवागला मागे टाकण्याची संधी आहे. ऋषभ पंतनं दिल्लीसाठा 77 इनिंगमध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकाच्या जोरावर 2327 रन काढले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 150.03 इतका असून सरासरी 35.80 आहे. त्यामुळे पंतला आता श्रेयस अय्यरला मागं टाकण्यासाठी आणखी 56 रनची आवश्यकता आहे. DC vs RR, Dream 11 Team Prediction : 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं नशीब दिल्लीला 'प्ले ऑफ' गाठण्याची संधी पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) सध्या टॉपवर आहे. तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान विरुद्धची लढत दिल्लीनं जिंकली तर ती 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम बनेल. व्यंकटेश अय्यरने सौरभ गांगुलीमुळे बदलली स्टाइल; सांगितलं खास कारण दिल्लीच्या टीमनं मागील आयपीएल स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारली होती. मुंबई इंडियन्सनं त्यांचा फायनलमध्ये पराभव केला होता. पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा असलेल्या या टीमनं आत्तापर्यंत 9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. तर राजस्थानची टीम 8 मॅचनंतर 4 विजय आणि 4 पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. ORANGE CAP: दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing :  शिखर धवन, पृथ्‍वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, सॅम बिलिंग्‍स/ स्‍टीव स्मिथ, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्खिया
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant

    पुढील बातम्या