Home /News /sport /

DC vs RR, Dream 11 Team Prediction : 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं नशीब

DC vs RR, Dream 11 Team Prediction : 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं नशीब

आयपीएल 2021 (IPL 2021) मधील दुसऱ्या टप्प्यातील डबल हेडर शनिवारपासून सुरू होणार आहेत. शनिवारी दुपारी 3.30 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात लढत होणार आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मधील दुसऱ्या टप्प्यातील डबल हेडर शनिवारपासून सुरू होणार आहेत. शनिवारी दुपारी 3.30 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात लढत होणार आहे. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) सध्या टॉपवर आहे. तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान विरुद्धची लढत दिल्लीनं जिंकली तर ती 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम बनेल. दिल्लीच्या टीमनं मागील आयपीएल स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारली होती. मुंबई इंडियन्सनं त्यांचा फायनलमध्ये पराभव केला होता. पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा असलेल्या या टीमनं आत्तापर्यंत 9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. तर राजस्थानची टीम 8 मॅचनंतर 4 विजय आणि 4 पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी चांगली झाली आहे. शिखर धवननं 9 मॅचमध्ये 53 च्या सरासरीनं 522 रन काढले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सच्या एकाही बॅटरला 300 पेक्षा जास्त रन करता आलेले नाहीत. कॅप्टन संजू सॅमसननं राजस्थानकडून सर्वाधिक 281 रन काढले आहेत. IPL 2021: 'हा' खेळाडू घेणार पंत आणि इशान किशनची जागा! विराटचाही आहे मोठा विश्वास DC vs RR Dream 11 विकेटकीपर: संजू  सॅमसन विकेटकिपर : शिखर धवन, श्रेयस अय्यर, एविन लुइस, पृथ्‍वी शॉ ऑल राउंडर्स: अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, लियाम लिविंगस्‍टोन बॉलर: आर अश्विन, मुस्‍तफिजुर रहमान, कगिसो रबाडा संभाव्य Playing 11 दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्‍वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरोम हेटमायेर, सॅम बिलिंग्‍स/ स्‍टीव स्मिथ, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्खिया PURPLE CAP: राजस्थान रॉयल्स : एविन लूईस, यशस्‍वी जायसवाल, संजू सैमसन, लियाम लिविंगस्‍टोन, महिपाल लोमरोर रियान पराग, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, कार्तिक त्‍यागी, चेतन सकारिया, मुस्‍तफिजुर रहमान
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या