मुंबई, 4 एप्रिल : ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यावर्षी (IPL 2021) कोलकाता नाईट राडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळणार आहे. हरभजनला यावर्षी महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) करारमुक्त केलं होतं. त्याला केकेआरनं दोन कोटींच्या बेस प्राईजला खरेदी केलं आहे. हरभजननं आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेला 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यानं आता टीमसोबत ट्रेनिंग सुरु केली आहे. हरभजननं त्यापूर्वी एक मजेदार व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग त्याच्या हॉटेलच्या रुममधून बाहेर येताना दिसत आहे. त्याला रुममधून बाहेर येण्याचं कारण विचारलं जातं. त्यावर 'माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानं मी हॉटेलच्या बाहेर पडलो असून आता प्रॅक्टीसला जात आहे,' असं उत्तर हरभजन देतो. त्यानंतर त्या व्हिडीओत एक पंजाबी गाणं सुरु होतं आणि त्यावर हरभजन भांगडा करु लागतो.
View this post on Instagram
कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नितीशचा दुसरा रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आला असून तो आता टीमसोबत प्रॅक्टीस करत आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नितीशचा एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना कोरनाला गांभीर्यानं घेण्याची सूचना केली होती.
( वाचा : 'या' टीमनं जिंकल्या सलग 22 वन-डे, Ricky Ponting च्या टीमला टाकलं मागं! )
हरभजनचं टीकाकारांना उत्तर
हरभजन सिंग 40 व्या वर्षी आयपीएल खेळत असल्यानं काही जणांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला हरभजननं उत्तर दिलं आहे. 'हा अजून का खेळतो असा प्रश्न काही जण विचारतात. तो त्यांचा विचार आहे, माझा नाही. मला जोपर्यंत खेळायचा आनंद मिळेल तोपर्यंत मी क्रिकेट खेळणार आहे. मला काहीही सिद्ध करायचं नाही. चांगलं खेळणं आणि मैदानात खेळण्याचा आंनद लुटणं हा माझा उद्देश आहे,' असं उत्तर हरभजननं दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19, Cricket, Harbhajan singh, Instagram post, IPL 2021, KKR