मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'या' टीमनं जिंकल्या सलग 22 वन-डे, Ricky Ponting च्या टीमला टाकलं मागं!

'या' टीमनं जिंकल्या सलग 22 वन-डे, Ricky Ponting च्या टीमला टाकलं मागं!

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमनं (Australia women cricket team) इतिहास रचला आहे. या टीमनं सलग 22 वी वन-डे मॅच जिंकण्याचा विक्रम केला आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमनं (Australia women cricket team) इतिहास रचला आहे. या टीमनं सलग 22 वी वन-डे मॅच जिंकण्याचा विक्रम केला आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमनं (Australia women cricket team) इतिहास रचला आहे. या टीमनं सलग 22 वी वन-डे मॅच जिंकण्याचा विक्रम केला आहे.

मुंबई, 4 एप्रिल : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमनं (Australia women cricket team) इतिहास रचला आहे. या टीमनं यजमान न्यूझीलंड विरुद्धची पहिली वन-डे मॅच 6 विकेट्सनं जिंकून हा इतिहास केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमनं सलग 22 वी वन-डे मॅच (New world record of 22 consecutive ODI wins) जिंकण्याचा विक्रम केला आहे. आजपर्यंत कोणत्याही पुरुष किंवा महिला टीमला  इतक्या वन-डे सलग जिंकता आलेल्या नाहीत. यापूर्वी रिकी पॉन्टिंगच्या (Ricky Ponting) नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या पुरुष टीमनं सलग 21 वन-डे मॅच जिंकल्या होत्या.

रिकी पॉन्टिंगच्या टीमनं 2003 साली हा पराक्रम केला होता. त्यांनी भारत, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, नामिबिया, न्यूझीलंड आणि केनिया या टीमला पराभूत केले होते. तर ऑस्ट्रेलियाची महिला टीम 2018 पासून आजवर एकही वन-डे मॅचमध्ये पराभूत झालेली नाही.

या टीमनं भारताचा 3-0, पाकिस्तान (3-0), वेस्ट इंडिज (3-0) आणि श्रीलंकेचा (3-0) असा पराभव केला आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध सर्वात जास्त 7 वन-डे जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमनं 2017 साली यापूर्वी शेवटची वन-डे मॅच हरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमनं यापूर्वी सलग 17 आणि 16 वन-डे जिंकल्या आहेत. भारताच्या महिला टीमनं देखील 2016-17 या कालावधीमध्ये सलग 16 वन-डे जिंकण्याची कामगिरी केली आहे.

( वाचा : सौरव गांगुली म्हणतो विराट-रोहितची बॅटींग आवडते पण 'यानं' सर्वाधिक प्रभावित केलं )

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. यजमान न्यूझीलंडची संपूर्ण टीम 48.5 ओव्हरमध्ये 212 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं 213 रनचं टार्गेट फक्त 4 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 69 बॉल शिल्लक असताना पार केलं. एलिसा हिली आणि एलिसा पेरी यांचं अर्धशतक हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. आता दोन टीममधील दुसरी वन-डे सात एप्रिल रोजी होणार आहे.

First published:

Tags: Australia, Cricket