मुंबई, 19 सप्टेंबर : तब्बल साडेचार महिन्यानंतर आयपीएल स्पर्धा (IPL 2021) पुन्हा एकदा सुरु होत आहे. यापूर्वी या स्पर्धेचा पहिला टप्पा भारतामध्ये झाला होता. त्यावेळी बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आयपीएल स्पर्धेचा पहिल्या टप्प्यामध्ये 29 मॅच झाल्या. 2 मे रोजी पहिल्या टप्प्यातील शेवटची मॅच पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात झाली होती. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्या लढतीनं आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात काय घडलं? आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम पॉईंट टेबलमध्ये आघाडीवर होती. दिल्लीनं 8 मॅचमध्ये 6 विजय आणि 2 पराभवासह 12 पॉईंट्सची कमाई केली आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 मॅचनंतर 5 विजयासह 10 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) देखील 7 मॅचनंतर 10 पॉईंट्स आहेत. पण त्यांचा रनरेट चेन्नईपेक्षा कमी असल्यानं ही टीम तिसऱ्या नंबरवर आहे. तर मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 7 मॅचमध्ये 4 विजय आणि 3 पराभवासह 8 पॉईंट्स कमावले असून ही टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. POINTS TABLE: आजचा विजय ठरणार गेमचेंजर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सला यंदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर होती. आता उर्वरित 7 पैकी जास्तीत जास्त मॅच जिंकत पॉईंट टेबलमध्ये टॉपवर पोहचण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. IPL 2021: दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच सेहवागनं सांगितलं विजेत्याचं नाव मुंबई इंडियन्सचा रनरेट (0.062) हा आरसीबीच्या रनरेटपेक्षा (-0.171) चांगला आहे. त्यामुळे आजची मॅच जिंकल्यास मुंबई पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचणार आहे. त्याचबरोबर चेन्नई सारख्या बलाढ्य टीमला पराभूत केल्यानंतर मुंबईच्या आत्मविश्वास भर पडणार असून त्याचा फायदा पुढील स्पर्धेत होणार आहे. स्पर्धेची सुरुवात संथ करण्यासाठी मुंबईची टीम प्रसिद्ध आहे. या संथ सुरुवातीचा शिक्का पुसण्यासाठी देखील आजच्या विजयाचा मोठा फायदा होणार आहे. IPL 2021 Live Streaming: CSK vs MI चा मुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार? मुंबईची संभाव्य टीम रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जेम्स नीशम/नॅथन कुल्टर-नाइल/ एडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह चेन्नईची संभाव्य टीम ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जॉस हेजलवूड/लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.