जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 202: कोरोनाचा धोका वाढला! दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू पॉझिटिव्ह

IPL 202: कोरोनाचा धोका वाढला! दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू पॉझिटिव्ह

IPL 202: कोरोनाचा धोका वाढला! दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू पॉझिटिव्ह

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी सिझनवरील (IPL 2021) कोरोनाचं (COVID-19) सावट वाढत आहे. आता दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी सिझनवरील (IPL 2021) कोरोनाचं (COVID-19) सावट वाढत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं नुकतंच उघड झालं आहे. त्यापाठोपाठ टीम इंडियाचा ऑल राऊंडर आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा प्रमुख खेळाडू असलेला अक्षर पटेल (Axar Patel) देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ANI या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार अक्षरला कोरोनाची लागण झाली असून त्याला इतरांपेक्षा वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तो सध्या सर्व कोरोना प्रोटोकॉलचं पालन देखील करत आहे. आयपीएल स्पर्धेत कोरोनाची लागण झालेला अक्षर पटेल हा दुसरा खेळाडू आहे.

जाहिरात

यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा बॅट्समन नितीश राणा याला कोरोनाची लागण झाली होती. नितीश राणाने 21 मार्चला मुंबईच्या केकेआरच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा तो कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आला होता. हा रिपोर्ट 19 मार्चचा होता. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. यानंतर नितीश इतरांपासून वेगळा होत विलगिकरणात गेला. नितीशची पुन्हा टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तो लवकरच सरावाला सुरूवात करेल,’ असं केकेआरने सांगितलं. गुरूवारी माध्यमांमध्ये नितीश राणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त समोर आलं होतं. नितीश कोलकात्याच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या मोसमात टॉप ऑर्डरला बॅटिंग करताना नितीशने चांगली कामगिरी केली होती. (  IPL 2021 : मोठी बातमी! वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  ) नितीश राणाच्या कोरोना रिपोर्टबाबतचा गोंधळ ताजा असतानाच आता अक्षर पटेलला देखील कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सची पहिली मॅच 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबईत होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात