मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021: लिलावाच्या काही तासांपूर्वी CSK च्या 'या' माजी खेळाडूची माघार!

IPL Auction 2021: लिलावाच्या काही तासांपूर्वी CSK च्या 'या' माजी खेळाडूची माघार!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी चेन्नईत लिलाव (IPL 2021 Auction) होणार आहे. या लिलावाच्या काही तास आधीच एका प्रमुख खेळाडूनं माघार घेतली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी चेन्नईत लिलाव (IPL 2021 Auction) होणार आहे. या लिलावाच्या काही तास आधीच एका प्रमुख खेळाडूनं माघार घेतली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी चेन्नईत लिलाव (IPL 2021 Auction) होणार आहे. या लिलावाच्या काही तास आधीच एका प्रमुख खेळाडूनं माघार घेतली आहे.

चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी चेन्नईत लिलाव (IPL 2021 Auction) होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष या लिलावाकडं लागलं आहे. या लिलावासाठी सर्व आठ फ्रँचायझींनी खास योजना देखील तयार केल्या आहेत. या लिलावापूर्वी काही तास आधी आलेल्या बातमीनं या योजनांना धक्का बसू शकतो. या लिलावातील प्रमुख खेळाडू असलेला इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वुडनं (Mark Wood) माघार घेतली आहे. वुड यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून आयपीएलमध्ये खेळला आहे.

का घेतली माघार?

मार्क वुडनं 2 कोटींच्या बेस प्राईजमध्ये स्वत:ची नोंदणी केली होती. लिलावापूर्वी काही तास आधीच वैयक्तिक कारणांमुळे त्यानं माघार घेतली आहे. वुड 2018 साली चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होता. मात्र त्यावर्षी इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे त्याला स्पर्धा सुरु असतानाच परत जावं लागलं होतं.

(हे वाचा : IPL Auction 2021 Live : 292 खेळाडू, पण कुणावर लागणार बोली? आज होणार फैसला )

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव असलेला वुड यंदा मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्स (PKBS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या टीमच्या रडारवर होता. आता त्यानं माघार घेतल्यानं या टीमना आपल्या योजना नव्यानं आखाव्या लागणार आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील उर्वरित दोन टेस्टसाठी वुडचा समावेश करण्यात आला आहे. या टीममधून टीमचा ऑलराऊंडर मोईन अलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर वुड आणि जॉनी बेयरस्टोचा समावेश करण्यात आला आहे.

(हे वाचा : IPL Auction 2021: जम्मू-काश्मीरच्या ‘या’ तीन खेळाडूंना आयपीएल लिलावात संधी )

भारत-इंग्लंड सीरिजमधील पहिली टेस्ट इंग्लंडनं जिंकली होती. तर दुसरी टेस्ट भारतानं जिंकून बरोबरी साधली आहे. आता तिसरी टेस्ट मॅच 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. ही टेस्ट डे-नाईट असून ‘पिंक बॉल’ नं खेळली जाईल.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Csk, India vs england, IPL 2021, Ipl 2021 auction, Mark wood, Mark wood backout, Withdraw from auction