मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: मुंबई इंडियन्सकडे परतणार 'भज्जी'? या तीन फ्रेंचायझी बोली लावण्याची शक्यता

IPL 2021: मुंबई इंडियन्सकडे परतणार 'भज्जी'? या तीन फ्रेंचायझी बोली लावण्याची शक्यता

IPL 2021 Auction: सीएसकेकडून (CSK) खेळल्यानंतर आता पुन्हा एकदा हरभजन (Harbhajan Singh)  लिलावात सहभागी होणार आहे. यामुळे त्याच्यावर कोण बोली लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

मुंबई, 17 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 14 व्या हंगामाचा (IPL 2021) लिलाव 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या लिलावापूर्वी अनुभवी खेळाडू असणाऱ्या हरभजन सिंग (Harbhajan Singh) चा चेन्नई सुपर किंग्सबरोबरचा (CSK) प्रवास संपला आहे. चेन्नईने करातून मुक्त केलेल्या हरभजनवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. 2 वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर आता पुन्हा एकदा हरभजन लिलावात सहभागी होणार आहे. यामुळे त्याच्यावर कोण बोली लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मागील काही काळापासून हरभजन कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळं त्याच्या फॉर्मविषयी चिंता आहे. पण अनुभवी असल्यानं टीममधील इतर खेळाडूंना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण यामध्ये 3 टीम हरभजनवर बोली लावण्यासाठी इच्छुक असतील. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) बाकी टीमप्रमाणे कोलकात्याकडे (KKR) अनुभवी स्पिनर नाहीत. त्यामुळे हरभजनवर बोली लावली जाऊ शकते. कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांना हरभजनच्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो. यामुळे कोलकाता उद्याच्या लिलावात हरभजनवर बोली लावू शकतो. टीमला अनुभवी ऑफस्पिनरची गरज आहे. IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलला ‘या’ टीमकडून खेळण्याची इच्छा, सांगितलं खास कारण! किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये(KXIP) सध्या स्पिनर खूप कमी आहेत. त्यांच्याकडे सध्या रवी बिष्णोई आणि मुरुगन अश्विन हे दोनच स्पिनर आहे. पंजाबने कृष्णप्पा गौतम आणि मुजीब उर रहमानला संघातून मुक्त केले असल्यामुळे हरभजनला संधी मिळू शकते. हरभजनच्या अनुभवाचा पंजाबच्या टीमला फायदा मिळू शकतो. याचबरोबर पंजाबच्या टीमचा कोच अनिल कुंबळे आहे. कुंबळे आणि हरभजन याने एकत्रित खूप क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे पंजाब उद्याच्या लिलावात हरभजनवर बोली लावू शकते. टी-20 मध्ये बुमराहला मिळणार विश्रांती? विराटशी पंगा घेणाऱ्या या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता मुंबई इंडियन्स (Mumabi Indians) आयपीएलच्या पहिल्या 10 सत्रांमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) हरभजनसिंग खेळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हरभजनवर मुंबई बोली लावू शकते. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. यामुळे या वर्षीसाठी मुंबई त्याला आपल्या टीममध्ये घेऊ शकते. मुंबईसाठी कॅप्टन्सी आणि बॉलिंग अटॅक सांभाळणाऱ्या हरभजनवर उद्या मुंबई बोली लावते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
First published:

Tags: Cricket news, Harbhajan singh, IPL 2021, Mumbai Indians, Sports

पुढील बातम्या