मुंबई, 17 जानेवारी : पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सध्या सगळं काही ठीक सुरू नाही. मोहम्मद आमिरने अचानक निवृत्ती घेतल्यामुळे वाद वाढत चालला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये निवडण्यात आलेल्या टीमवरूनही टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी ऑल कॅप्टन इंजमाम उल हकनं टीमच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) देखील टीका केली आहे.
काय म्हणाला आफ्रिदी?
आफ्रिदीनं पाकिस्तानच्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंना भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविडकडून (Rahul Dravid) शिकण्याचा सल्ला दिला आहे. द्रविडचं उदाहरण देताना आफ्रिदी म्हणतो, “द्रविड मोठा खेळाडू होता. तरीही तो अंडर-19 भारतीय क्रिकेट टीमला प्रशिक्षण देतो. याच वयात खेळाडू घडत असतात. पाकिस्तानचे स्टार बॅट्समन इंजमाम उल हक, मोहम्मद युसुफ आणि युनुस खान यांनी देखील अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 टीमसोबत काम केलं पाहिजे. पाकिस्तानच्या टीमला प्रशिक्षण देऊन काही उपयोग नाही.
हे ही वाचा-
तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया
नऊ नवे चेहरे!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या टीममध्ये नऊ नव्या खेळाडूंना संघी देण्यात आली आहे. या टीममध्ये 36 वर्षाचा ताबिश खान हा देखील एक नवा चेहरा आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये तरुण खेळाडूंची कमतरता आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. इंजमाम, मिसबाह, युनुस खान, सईद अजमल आणि शाहिद आफ्रिदी यांच्या रिटायरमेंटनंतर पाकिस्तानला आजवर त्यांचा वारसदार सापडलेला नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या ज्येष्ठ खेळाडूंनी मुलांना कोचिंग द्यावं असा सल्ला आफ्रिदीनं दिला आहे.
मोहम्मद आमिरची निवृत्ती
टीम मॅनेजमेंट मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरनं मागच्या महिन्यात निवृत्ती जाहीर केली होती. आमिरनं पाकिस्तानचा मुख्य कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस यांच्यावर आरोप केले होते. क्रिकेटमधील कामगिरीमुळं नाही तर वैयक्तितक कारणांमुळे आपल्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं आहे, असा आरोप आमिरनं केला होताय पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील भयावह संस्कृती नष्ट करण्याची मागणी देखील त्यानं केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.