Home /News /sport /

मोठा फरक! भारतीय महिला टीमचा संपूर्ण पगार एकट्या विराट कोहलीपेक्षा कमी

मोठा फरक! भारतीय महिला टीमचा संपूर्ण पगार एकट्या विराट कोहलीपेक्षा कमी

बीसीसीआय (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. या बोर्डाशी करारबद्ध असलेल्या महिला क्रिकेटपटूंचा वार्षिक पगार वाढवला जाईल, अशी अपेक्षा होती.

    मुंबई, 20 मे : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) बुधवारी महिला क्रिकेटपटूंचा वार्षिक पगार (BCCI Contracts List) जाहीर केला. बोर्डानं जाहीर केलेल्या यादीमध्ये 19 जणींचा समावेश आहे. या सर्वांची A, B आणि C गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. महिला खेळाडूंच्या पगाराची यादी पाहिली तर बीसीसीआयकडून त्यांना मिळणारी वागणूक स्पष्ट होते. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या पगारामध्ये 14 ते 70 पट अंतर आहे. ज्या 19 क्रिकेटपटूंना बोर्डानं करारबद्ध केलं आहे, त्या सर्वांचा एकूण वार्षिक पगार एकट्या विराट कोहलीला (Virat Kohli) मिळणाऱ्या पगारापेक्षा 1.90 कोटी रुपये कमी आहे. विराटचा पगार 7 कोटी आहे. तर बोर्डाच्या करारामध्ये सहभागी असलेल्या 19 महिला क्रिकेटपटूंच्या पगाराची एकूण रक्कम 5.10 कोटी आहे. भारतीय महिला क्रिकेटची शान असलेल्या मिताली राजला (Mithali Raj) विराटपेक्षा 23 पट कमी पगार मिळणार आहे. टी20 क्रिकेटमधून रिटायर झालेल्या मितालीचा वार्षिक पगार 30 लाख आहे. सौरव गांगुलीच्या कार्यकाळातही भेदभाव बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. या बोर्डाशी करारबद्ध असलेल्या महिला क्रिकेटपटूंचा वार्षिक पगार वाढवला जाईल, अशी अपेक्षा होती. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर हा पुरुष आणि महिला क्रिकेट टीममधील फरक कमी  होईल अशी अनेकांची आशा होती. त्याांची देखील निराशा झाली आहे. गांगुलीच्या राजवटीमध्येही फरक स्पष्ट आहे. 2 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीमची धडक भारतीय महिला क्रिकेट टीमनं मागील वन-डे वर्ल्ड कप आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. हे दोन वर्ल्ड कप गाजवणाऱ्या बहुतेक खेळाडूंचा या करारात समावेश आहे. टीमच्या या कामगिरीच्या आधारावर अधिक पगाराची मागणी केली जात होती. खरा कॅप्टन! विराटने वाचवला क्रिकेटपटूच्या आईचा जीव, कोरोना उपचारासाठी दिले 6.77 लाख रुपये A ग्रेडमधील खेळाडूंना 50 लाख महिला क्रिकेटमधील सर्वोच्च अशा A ग्रेडमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळणार आहेत. B ग्रेडमधील खेळाडूंचा वार्षिक पगार  30 लाख तर C ग्रेडमधील खेळाडूंचा वार्षिक पगार 10 लाख असेल. B ग्रेडमध्ये मिताली राज, झूलन गोस्वामी, दिप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेवश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा रोड्रिग्ज यांचा समावेश आहे. तर C ग्रेडमध्ये मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजी वस्राकर, हरलीन देओल, प्रिया पुनिया आणि रिचा घोष यांना जागा मिळाली आहे. बीसीसीआयनं यापूर्वी केलेल्या करारामध्ये 22 खेळाडूंचा समावेश होता. यंदा ही यादी 3 ने कमी करण्यात आली आहे. वेदा कृष्णमूर्ती, एकता बिष्ट, डी. हेमलता आणि अनुजा पाटील या क्रिकेटपटूंना या यादीमधून वगळण्यात आले आहे. ‘पुढील 3 जन्म ‘हे’ काम करायचं आहे,’ सौरव गांगुलीनं सांगितली ‘मन की बात’ विराट, रोहित आणि बुमराहचा पगार माहिती आहे? बीसीसीआयनं पुरुष खेळाडूंची 4 गटामध्ये विभागणी केली आहे. A+ गटातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा पगार प्रत्येकी 7 कोटी आहे. A ग्रेडमधील खेळाडूंचा  5 कोटी तर B आणि C ग्रेडमधील खेळाडूंचा वार्षिक पगार अनुक्रमे 3 आणि 1 कोटी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket

    पुढील बातम्या