मुंबई, 19 मे : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) सध्या खूप व्यस्त आहेत. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर उर्वरित सामन्यांच्या आयोजानी तयारी गांगुली करत आहेत. (सौरव गांगुली इन्स्टाग्राम)
या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत गांगुलीनी सोशल मीडियावर (Social Media) एक इच्छा व्यक्त केली आहे. गांगुलीनं एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये दादा निळ्या रंगाच्या जर्सीत भारताकडून खेळताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करत गांगुलीनं म्हंटलं आहे, मी पुढील तीन जन्म हे काम करु शकलो तर...गांगुलीला पुढील तीन जन्म टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.
गांगुलीचा हा फोटो व्हायरल (Viral) झाला आहे. क्रिकेट फॅन्सनी त्याच्या इच्छेचं स्वागत केलं. ‘तू आम्हाला आनंदी होण्याची हजार कारणं दिली आहेस. पुढील 3 जन्म काय प्रत्येक जन्मात क्रिकेटपटू म्हणून जन्म घेण्याचा तुझा अधिकार आहे,’ असं एका फॅन्सनं म्हंटलं आहे.