मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

खरा कॅप्टन! विराटने वाचवला क्रिकेटपटूच्या आईचा जीव, कोरोना उपचारासाठी दिले 6.77 लाख रुपये

खरा कॅप्टन! विराटने वाचवला क्रिकेटपटूच्या आईचा जीव, कोरोना उपचारासाठी दिले 6.77 लाख रुपये

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा फक्त जगातला सर्वोत्तम बॅट्समनच नाही, तर चांगला माणूसही आहे. क्रिकेटशिवाय विराट कायमच सामाजिक उपक्रमांमध्येही भाग घेत असतो आणि लोकांची मदत करत असतो.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 मे : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा फक्त जगातला सर्वोत्तम बॅट्समनच नाही, तर चांगला माणूसही आहे. क्रिकेटशिवाय विराट कायमच सामाजिक उपक्रमांमध्येही भाग घेत असतो आणि लोकांची मदत करत असतो. आपल्या उत्कृष्ट बॅटिंगप्रमाणेच आता विराटने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विराटने टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटूच्या आईचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

विराटने भारताची माजी क्रिकेटपटू केएस श्रवंती नायडूच्या (KS Sravanthi Naidu) आईचा जीव वाचवला. श्रवंतीच्या आईला कोरोना झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुग्णालयात ठेवलं असलं तरी उपचारासाठी त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, त्यामुळे विराटने श्रवंतीला 6.77 लाख रुपये दिले. श्रवंतीने बीसीसीआय (BCCI) आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनलाही मदतीचं आवाहन केलं होतं.

विराट कोहलीला श्रवंतीच्या आर्थिक अडचणींबाबत कळालं. बीसीसीआय साऊथ झोनच्या माजी संयोजक एन.विद्या यादव यांनी ट्वीट करून श्रवंतीच्या आईला मदत करा, असं आवाहन केलं. यामध्ये त्यांनी विराटलाही टॅग केलं. विराटनेही लगेच या ट्वीटवर रिप्लाय दिला. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांनीही श्रवंतीच्या आईसाठी पैसे जमा केले, त्यांनीही विराटला याबाबत सांगितलं.

विराट आणि अनुष्काने (Anushka Sharma) कोरोना रुग्णांना मदत म्हणून 11 कोटी रुपये जमा केले. यात विराट-अनुष्काने स्वत: 2 कोटी रुपयांची मदत केली. या पैशांमधून ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांची मदत केली जाणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Team india, Virat kohli