जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाचं गुलाबी स्वप्न होणार पूर्ण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडणार इतिहास

टीम इंडियाचं गुलाबी स्वप्न होणार पूर्ण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडणार इतिहास

टीम इंडियाचं गुलाबी स्वप्न होणार पूर्ण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडणार इतिहास

भारतीय क्रिकेट टीमसाठी हे वर्ष महत्त्वाचं आहे. टीम इंडियाच्या (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यंदा इतिहास घडणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मे : भारतीय क्रिकेट टीमसाठी हे वर्ष महत्त्वाचं आहे. टीम इंडिया (Team India) पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final ) खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्धची पाच टेस्टची मालिका तसेच ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमची परीक्षा असेल. पुरुष टीमसोबतच महिला टीमसाठी देखील हे वर्ष ऐतिहासिक आहे. महिला टीम यंदा तब्बल 7 वर्षांनंतर टेस्ट मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर महिला टीमसाठी  एक आनंदाची घटना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडणार आहे. भारतीय महिला क्रिकेट टीम (Team India Women) इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पहिल्यांदाच महिला टीम पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल. बीसीसीआय सचिन जय शहा (Jay Shah) यांनी ही माहिती दिली आहे. महिला टीमनं यापूर्वी 2006 साली ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच खेळली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला टीममध्ये आजवर 9 टेस्ट झाले असून यापैकी टीम इंडियाला एकही टेस्ट जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियानं 4 टेस्ट जिंकल्या असून 5 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये 2006 नंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच होणार आहे.

जाहिरात

मोठी बातमी! राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिजचे वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही. पण भारतीय महिला टीमनं एका कॅलेंडर वर्षात 2 टेस्ट खेळल्या आहेत, असं खूप कमी वेळा झाले आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात 16 जून पासून ब्रिस्टलमध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच खेळणार आहे. भारतीय पुरुष टीम देखील पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यासाठी दोन्ही टीम एकाच विमानाने इंग्लंडला जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात