लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताचा 9 विकेटने विजय झाला. भारताला या मॅचमध्ये विजयासाठी 158 रनचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग टीमने फक्त 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि पूनम राऊत (Poonam Raut) या दोघींनी अर्धशतकं केली, तर झूलन गोस्वामीने (Jhulan Goswami) 42 रन देऊन 4 विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडला 3 विकेट घेण्यात यश आलं. (हे वाचा- Vaathi Coming: ‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO ) भारतीय टीमच्या या विजयात स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले, यात 3 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही 125 चा होता. तर पूनम राऊतने 89 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली. मंधानाने लागोपाठ 10व्यांदा आव्हानाचा पाठलाग करताना 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. हा रेकॉर्ड करणारी ती जगातली पहिली क्रिकेटपटू आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid19, Cricket, Indian women's team, Social media viral, Sports, Team india, Vaathi