जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Vaathi Coming: ‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO

Vaathi Coming: ‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO

Vaathi Coming: ‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO

भारताचा प्रमुख स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) यानं एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अश्विन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सोबत डान्स केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 20  फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये होणार आहे. ही या मालिकेतील एकमेव डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टसाठी सध्या भारतीय खेळाडू जिममध्ये जोरदार घाम गाळत आहेत. भारताचा प्रमुख स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) यानं एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अश्विन हार्दिक पांड्या (Hardik Pandya)  आणि कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सोबत डान्स केला आहे. अश्विननं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. कोणत्या गाण्यावर केला डान्स? भारतीय खेळाडूंचा हा डान्स सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. दक्षिण भारतामधील सुपरस्टार विजयच्या (Vijay) गाण्यावर नाच केला आहे. अश्विन, हार्दिक आणि कुलदीप यांनी ज्या गाण्यावर डान्स केला आहे ते गाणं विजयच्या ‘मास्टर’ (Master) या तामिळ सिनेमातील आहे. ‘वाथी कमिंग’ (Vaathi Coming) हे ते सुपरहिट गाणं आहे. या गाण्याला YouTube वर 55 मिलियनपेक्षा जास्त हिट्स मिळाले आहेत. या गाण्यातील विजयच्या स्टेप्स चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत.

(वाचा -  स्पायडरमॅन, स्पायडरमॅन… ऋषभ पंतचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का? )

तामिळ भाषेतील या सिनेमातील गाण्यावर विजयचा फॅन असलेल्या अश्विननं पहिल्यांदा नाचायला सुरुवात केली. त्यानंतर हार्दिकनं नाच सुरू केला. या दोघांच्यामध्ये कुलदीपनं अजब स्टेप्स करत सर्वांचं मनोरंजन केलं.

जाहिरात

भारतानं चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करत 317 रननं विजय मिळवला. अश्विन दुसऱ्या टेस्टचा हिरो होता. त्यानं दुसऱ्या डावात 107 रन केले. त्याचबरोबर पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. ( वाचा :  स्पायडरमॅन, स्पायडरमॅन… ऋषभ पंतचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का? ) कुलदीप यादवनं या टेस्टमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन करत दोन विकेट्स घेतल्या. तर, हार्दिक पांड्याला या मालिकेत अजून संधी मिळालेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात