अबुधाबी, 29 जानेवारी : अबुधाबी (Abu Dhabi) मधील T10 लीग (T10 League 2021) स्पर्धेची सुरुवात मोठी धमाकेदार झाली आहे. नव्या सिझनमधील मराठा अरेबियन्स विरुद्ध नॉर्दन वॉरियर्स (Maratha Arabians vs Northern Warriors) ही मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. या मॅचमध्ये मराठा अरेबियन्सच्या अब्दुल शकूरनं (Abdul Shakoor) वादळी बॅटींग केली. त्यानं फक्त 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकालं. त्याच्या या खेळीमुळे अरेबियन्सनं ही मॅच पाच विकेट्सनं जिंकली. निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 128 रनचं अवघड आव्हान मराठा अरेबिन्यपुढं होतं. त्यांची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच बॉलवर जावेद अहमदी 6 रन काढून आऊट झाला. लॉरी इवान्सही फक्त 9 रन काढून परतला. एका बाजूनं विकेट्स पडत होत्या, त्याचवेळी अब्दुलनं प्रतिहल्ला चढवला. अब्दुलची वादळी खेळी अब्दुलनं अर्धशतक झळकावण्यासाठी फक्त 14 बॉल घेतले. त्यानं 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतरही त्याचा वेळ थोडा मंदावला. त्यानं पुढचे 23 रन काढण्यासाठी 15 बॉल घेतले. अब्दुलनं एकूण 29 बॉलमध्ये 73 रन काढले. अब्दुल शकूरशिवाय फक्त मोहम्मद हाफीज या एकाच बॅट्समननं दोन आकडी रन्स केले. त्यानं 19 रनची खेळी केली. अब्दुलनं अगदी एकहाती खेळी करत टीमला विजय मिळवून दिला.
(वाचा - IND vs ENG: चेन्नई टेस्टपूर्वी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा टीम इंडियाला इशारा! )
MARATHA WIN!
— T10 Global (@T10League) January 28, 2021
Captain Mosaddek Hossain hits the winning runs and @MarathaArabians have the perfect start! 🔥
Abdul Shakoor Bangash is the star of the show with a remarkable 7⃣3⃣ from just 2⃣8⃣ balls 👏
The 2019 #AbuDhabiT10 Champions are off to a flyer 🙌 pic.twitter.com/Y2ZI6AuY69
वॉरियर्सकडून वेस्ट इंडिजचा दम नॉर्दन वॉरियर्सची टॉप ऑर्डर वेस्ट इंडिजच्या बॅट्समननं सजली आहे. त्यांच्याकडून ब्रँडन किंगनं 13 बॉलमध्ये 29 रन काढले. कॅप्टन पूरननं 9 बॉलमध्ये 19 रन काढले. तर सिमन्सनं 54 रनची खेळी केली. वॉरियर्सनं अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅचममध्ये रंगत कायम ठेवली होती, अगदी शेवटच्या बॉलवर चौकार मारत मराठा अरेबियन्सनं या स्पर्धेत विजयी सलामी दिली.

)







