मुंबई, 16 मे : क्रिकेटपटू आणि चित्रपट अभिनेत्री यांच्यातील लव्ह स्टोरी (love stories) काही नवी नाहीत. मन्सूर अली खान पतौडी पासून विराट कोहलीपर्यंत अनेकांनी चित्रपट अभिनेत्रींसोबत लग्न केलं. या सर्वांची लव्ह स्टोरी देखील चांगलीच गाजली. या यादीमध्ये आणखी एक नाव वाढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.
आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सर्वांचं लक्ष वेधून घेणारा मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) या दोघांमधील अफेयर्सची चर्चा सध्या सुरु आहे. या चर्चांवर अखेर ऋतुराजनं प्रतिक्रिया दिली आहे.
कशी सुरु झाली चर्चा?
ऋतुराजनं फाफ ड्यू प्लेसिस सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जिंकल्यानंतर चेहऱ्यावर अतिरिक्त हास्य फुलतं असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलंय. ऋतुराजच्या या फोटोला मराठी अभिनेत्री सायली संजीवनं तिच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन रिप्लाय दिलाय. सायलीनं या फोटोवर लव्हची इमोजी टाकली आहे. सायलीची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल (Viral) झाली ऋतुराजच्या फोटोवर सायली क्लीन बोल्ड झाल्याची चर्चा त्यामुळे सुरु झाली होती.

त्यानंतर काही दिवसांनी सायलीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवे फोटो शेअर केले आहेत. त्यावर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स तसेच लाइक्सही दिले आहे. पण यातील ऋतुराज गायकवाडच्या फोटोनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं. ऋतुराजने सायलीच्या फोटोवर
"Woahh" अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सायली आणि ऋतुराज या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं.

ही सर्व 'काहे दिया कमेंट' ची चर्चा सुरु असताना ऋतुराज गायकवाडनं या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं सायलीसोबत अफेयर असल्याची बातमी फेटाळली आहे. या प्रकारच्या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं ऋतुराजनं सांगितलं आहे. माझी विकेट फक्त बॉलर घेऊ शकतो. तोच मला क्लीन बोल्ड करु शकतो, अन्य कुणीही नाही. असं ऋतुराजनं स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.