मुंबई, 12 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup 2022) भारताची तिसरी मॅच वेस्ट इंडिज (India women vs West Indies Women) विरूद्ध सुरू आहे. या मॅचमध्ये टॉससाठी उतरताच भारतीय कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) नवा रेकॉर्ड केला आहे. मिताली आता महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक मॅचमध्ये कॅप्टनसी करणारी खेळाडू बनली आहे. मितालीची भारतीय कॅप्टन म्हणून ही 24 वी मॅच आहे. तिने ऑस्ट्रेलियाचा बोलिंडा क्लार्कचा रेकॉर्ड तोडला आहे. क्लार्कनं 23 वर्ल्ड कप मॅचमध्ये कॅप्टनसी केली होती. 2005 मधील वर्ल्ड कपपासून टीम इंडियाची कॅप्टनसी करणाऱ्या मितालीनं 24 पैकी 14 मॅच जिंकल्या आहेत, तर 8 गमावल्या आहेत. तर एका मॅचचा निकाल लागला नाही.
𝗔𝗻𝗼𝘁𝗵𝗲𝗿 𝗠𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 𝗳𝗼𝗿 𝗠𝗮𝗴𝗻𝗶𝗳𝗶𝗰𝗲𝗻𝘁 𝗠𝗶𝘁𝗵𝗮𝗹𝗶 🙌 🙌#TeamIndia Captain @M_Raj03 now holds the record of captaining in most matches - 2⃣4⃣ - in the Women's ODI World Cups. 🔝 👏#CWC22 | #WIvIND pic.twitter.com/qkbcXa2srP
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
वेस्ट इंडिज विरूद्धच्या ऐतिहासिक मॅचमध्ये मितालीनं बॅटर म्हणून निराशा केली. या मॅचमध्ये टॉस जिंकून मितालीनं पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि यास्तिका भाटिया या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 49 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर यास्तिका 31 रन काढून आऊट झाली. IPL 2022 : श्रेयस अय्यरला मिळणार वर्ल्ड चॅम्पियनची साथ, शाहरूखच्या टीममध्ये नवी एन्ट्री! यास्तिका आऊट झाल्यानंतर मितालीनं स्वत:ला प्रमोशन देत तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला येण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही. मिताली फक्त 5 रन काढून आऊट झाली. भारतीय टीमनं या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा 107 रनने पराभव करत जोरदार सुरूवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडियाचा 62 रननं पराभव झाला. आता वेस्ट इंडिजला पराभूत करत पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचा टीमचा प्रयत्न असेल.