मुंबई, 30 जानेवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेसाठी टीम इंडियाच्या 18 खेळाडूंची घोषणा टीम इंडियाने यापूर्वीच केली आहे. त्यानंतर दोन तरूण खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिले आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंचा निवड समितीनं समावेश केला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि स्पिनर रविकृष्णन साई किशोर (Ravisrinivasan Sai Kishore) यांचा स्टँड बाय खेळाडू म्हणून टीममध्ये समावेश केला आहे. शाहरूख खाननं गेल्या काही महिन्यात आक्रमक बॅटींगनं भारतीय क्रिकेट गाजवलं आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत त्याने तामिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले होते. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मुख्य टीममध्ये दीपक हुडाला (Deepak Hooda) शाहरूखच्या ऐवजी प्राधान्य देण्यात आले आहे. शाहरूख खाननं यापूर्वी आयपीएल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. त्याचा खेळ पाहून कायरन पोलार्डची आठवण येते, असं मत पंजाब किंग्जचे कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले होते. उत्तम फिनिशर असलेल्या शाहरूखला यंदाच्या आयपीएलमध्येही उत्तम किंमत मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून शाहरूख आणि साई किशोरचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. साई किशोर नेटमध्येही उपयुक्त बॉलर ठरेल, असे मत बीसीसीआयमधील सूत्रांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना व्यक्त केले आहे. आक्रमक क्रिकेटपटूची वयाच्या 29 व्या वर्षी अचानक निवृत्ती, टीमला मोठा धक्का भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान भारताची टी20 टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







