मुंबई, 30 जानेवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या नेदरलँड क्रिकेटला (Netherlands Cricket) मोठा धक्का बसला आहे. या टीममधील स्टार बॅटर बेन कूपरनं (Ben Cooper) तात्काळ निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 वर्षांच्या कूपरने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने नेदरलँडकडून 71 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कूपरनं ट्विट करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. ‘आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर करत आहे. 8 वर्ष देशाचे प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची बाब होती. हा कालावधी अविस्मरणीय क्षण आणि चढ-उतारांनी भरलेला आहे. माझ्या लहाणपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आभार. मी माझ्या टीममधील वर्तमान आणि माजी खेळाडूंचेही आभार मानतो. या सुंदर आठवणींसह तुमचा निरोप घेत आहे.’ असे ट्विट कूपरनं केले आहे.
Thanks to everyone who’s supported me throughout my journey with @KNCBcricket it’s been unreal but it’s time for me to move on in to the next stage of my life. pic.twitter.com/aBS8FPHmwC
— Ben N Cooper (@bencooper_32) January 29, 2022
मला सध्याच्या टीममधील आणि नवोदीत क्रिकेटपटूंच्या क्षमतेवर कोणतीही शंका नाही. ते नेदरलँड क्रिकेटला आणखी उंचीवर नेतील. कूपरनं टी20 क्रिकेटमध्ये नेदरलँडकडून सर्वात जास्त 1239 रन केले आहेत. त्याने हे रन 58 मॅचमध्ये केले. कूपरनं 13 वन-डे सामने खेळले. यामध्ये 187 रन केले. U19 World Cup, IND vs BAN: 2 वर्षांनी काढला पराभवाचा वचपा, टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणं कूपर जगभरातील टी20 लीग खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेदरलँडच्या टीमला या आक्रमक बॅटरची कमतरता नक्की जाणवणार आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या कूपरनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरूद्ध मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. कूपरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक देखील आहे. त्याचबरोबर तो एका टी20 मॅचमध्ये 91 रन काढून नाबाद राहिला होता.

)







