मुंबई, 31 जानेवारी : टीम इंडियाचा स्पिनर रवी बिष्णोईचं (Ravi Bishnoi) नशिब एका आठवड्यात बदललं आहे. त्याला लखनऊच्या आयपीएल टीमनं 4 कोटींना करारबद्ध केले आहे. तसंच वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. पहिल्यांदा निळी जर्सी घालण्यासाठी सज्ज झालेल्या रवी बिश्नोईचं सध्या सर्व जण अभिनंदन करत आहेत. बिष्णोईचा एक फोटो सध्या व्हायरल झालाय. त्या फोटोत त्याच्यासोबत पूजा बिष्णोई (Pooja Bishnoi) ही लहान मुलगी दिसत आहे. त्या फोटोवरून पूजा रवीची कोण आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. दिग्गजांशी कनेक्शन 10 वर्षांच्या पूजाचा जन्म जोधपूरमध्ये झाला आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) तिला फ्लॅट दिला आहे. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) तिला मुंबईत बोलावलं होतं. सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील पूजाचे फॅन आहेत. पूजानं अगदी कमी वयात तिची जिद्द आणि चिकाटीनं या दिग्गजांना फॅन बनवलंय. ज्या वयात मुलं चालायला शिकतात त्याच वयात पूजानं अॅथलिट होण्याचा निश्चय केला होता. ती वयाच्या तिसऱ्या वर्षापासून याची तयारी करत आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच पूजानं सिक्स पॅक एब्स बनवत जगभर प्रसिद्धी मिळवली होती. सहाव्या वर्षी तिनं 48 मिनिटांत 10 किलोमीटर शर्यत पूर्ण केली. 8 वर्षांची असताना तिनं 3 किलोमीटर शर्यत 12.5 मिनिटांत पूर्ण केली. पूजा उत्तम धावपटू आणि फास्ट बॉलर देखील आहे. विराट कोहली फाऊंडेशन तिचा सर्व खर्च करत आहे. या फाऊडेंशननं तिला जोधपूरला फ्लॅट दिला आहे. इतक्या कमी वयात तिचे सोशल मीडियावर अनेक फॅन आहेत. मागच्यावर्षी महेंद्रसिंह धोनीनं तिला एका जाहिरातीचं शूटींग करण्यासाठी मुंबईत बोलावले होते.
टीम इंडियातील खेळाडूच्या पत्नीनं 5 महिन्यांत कमी केले 13 किलो वजन!
रवी बिष्णोईची कोण आहे? पूजानं काही दिवसांपूर्वी रवी बिष्णोईचे अभिनंदन केले. त्या दोघांचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे. पूजा आणि रवी दोघंही जोधपूरचे आहेत. तसेच त्यांचे आडनाव देखील एक आहे. त्यामुळे ती रवी बिष्णोईची बहीण आहे असा अनेकांचा समज आहे. पण तो समज चुकीचा आहे. रवी बिष्णोईला दोन बहिणी असून त्यांचे नाव अनिता आणि रिंकू आहे. तर पूजाच्या भावाचे नाव कुलदीप बिष्णोई आहे. या दोन्ही कुटुंबामध्ये चांगले संबंध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.