मुंबई, 29 जानेवारी: वेस्ट इंडिज क्रिकेट टीम 7 दिवसांनंतर भारताविरूद्ध
(India vs West Indies) पहिला वन-डे सामना खेळणार आहे. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच त्यांच्या टीममध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. वेस्ट इंडिज मीडियानं हा दावा केला आहे. कॅप्टन कायरन पोलार्डच्या
(Kieron Pollard) एका निर्णयामुळे हा वाद निर्माण झाला आहे. पोलार्डवर खेळाडूंमध्ये भेदभाव केल्याचा आरोप होत आहे.
वेस्ट इंडिजची सध्या इंग्लंड विरूद्ध टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत पोलार्ड जाणीवपूर्वक ऑल राऊंडर ओडियन स्मिथकडे
(Odean Smith) दुर्लक्ष करत आहे, असा हा आरोप आहे. याबाबतची एक व्हाईस नोट देखील व्हायरल झाली आहे. आयर्लंड विरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर काही मीडियातील प्रतिनिधींना ही व्हाईस नोट पाठवण्यात आली होती. त्यामध्ये वेस्ट इंडिज प्लेयर्स असोसिएशन स्मिथला मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्रस्त असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने हा वाद सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याचेही या नोटमध्ये म्हंटले होते. ही नोट नेमकी कुणी पाठवली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
टीम मॅनेजमेंटनं फेटाळला आरोप
वेस्ट इंडिज टीमचे हेड कोच फिल सिमन्स यांनी हा आरोप फेटाळला आहे. 'माझ्या उपस्थितीमध्ये टीममध्ये असं काही घडणार नाही. इथं कुणीही कुणाला टार्गेट केलेलं नाही. आम्ही पहिल्यांदा खेळाडूला एक चांगला माणूस समजतो. त्यानंतर त्याच्याकडे चांगला क्रिकेटपटू म्हणून पाहतो. वेस्ट इंडिज टीमचे सर्व खेळाडू सध्या एकत्र आहेत. माझ्या क्रिकेट आणि कोचिंग करिअरमध्ये मी नेहमीच या गोष्टीला प्राधान्य दिलं आहे. तसंच खेळाडूंनाही हे समजावून सांगितलं आहे.' असं सिमन्स यांनी स्पष्ट केलं.
... तर सचिन तेंडुलकरनं 1 लाख रन केले असते! शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
काय आहे वाद?
इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ओडियन स्मिथ खेळला. पहिल्या मॅचमध्ये त्यानं फक्त 1 ओव्हर बॉलिंग केली. तर दुसऱ्या मॅचमध्ये त्याला बॉलिंग दिलीच नाही. तिसऱ्या टी20 सामन्यातून त्याला वगळण्यात आले. स्मिथच्या जागी रोवमॅन पॉवेलचा टीममध्ये समावेश करण्यात आला. पॉवेलनं 53 बॉलमध्ये 107 रनची खेळी केली. कॅप्टन पोलार्डनं जाणीवपूर्वक स्मिथला पहिल्या दोन मॅचमध्ये बॉलिंग दिली नाही. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातून वगळलं, असा आरोप करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.