मुंबई, 29 जानेवारी: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) इंटरनॅशनल क्रिकेटमधील सध्याच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएबनं त्याच्या यू ट्यूब चॅनलवर बोलताना आयसीसीचे सध्याचे नियम फक्त बॅटर्सच्या फायद्यासाठी आहेत, असा आरोप केला आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या क्रिकेट खेळत असता तर त्याने 1 लाखांपेक्षा जास्त रन केले असते, असा दावा केला आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याशी शोएबनं चर्चा केली आहे. त्यामध्ये शोएब म्हणला की, ‘तुम्ही वन-डे क्रिकेट 2 नव्या बॉलनं खेळता. नियम आणखी कडक केले आहेत. सध्या बॅटर्सना झुकतं माप दिले जात आहे. आता तीन रिव्ह्यू घेण्याचा नियम आहे. हा नियम सचिनच्या काळात असता तर त्याने एक लाखांपेक्षा जास्त रन केले असते. सचिननं नेहमीच खतरनाक बॉलर्सचा सामना केला,’ असे शोएब म्हणाला.
Coming soon. A knowledgeable hard hitting conversation with great @RaviShastriOfc . About yesterday, today & tomorrow of cricket. pic.twitter.com/CUIXho40GT
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) January 25, 2022
शोएब सचिनबाबत बोलताना म्हणाला, ‘मला वास्तविक सचिनची दया येते. त्याने सुरूवातील वासिम अक्रम आण वकार यूनुस विरूद्ध क्रिकेट खेळले. त्यानंतर तो शेन वॉर्न विरूद्ध खेळला. तसचं ब्रेट ली आणि शोएब अख्तरचाही त्यानं सामना केला. सचिन पुढच्या पिढीतील फास्ट बॉलर्स विरूद्धही खेळला आहे. त्यामुळे मी त्याला खूप चांगला बॅटर मानतो.’ U 19 World Cup : आता भारत-पाकिस्तान सेमी फायनल नाही, ऑस्ट्रेलियानं केली फॅन्सची निराशा शोएब अख्तरनं यावेळी क्रिकेटमध्ये बाऊन्सर वाढवण्याचीही मागणी केली. ‘क्रिकेटचं संतुलन कायम ठेवण्यासाठी तुम्हाला बाऊन्सरची संख्या वाढवावी लागेल. यापूर्वी टी20 क्रिकेट नव्हते. तेव्हा वर्षातून 12 ते 15 टेस्ट होत असत. आता ही संख्या कमी झाली आहे.’ असे मत शोएब अख्तरनं व्यक्त केले. शोएबनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 444 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं सचिनला वन-डे क्रिकेटमध्ये पाच वेळा तर टेस्टमध्ये 3 वेळा आऊट केले आहे.