जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup: Chakda Xpress झुलनची कमाल, वर्ल्ड कपमध्ये बनली नंबर 1

Women's World Cup: Chakda Xpress झुलनची कमाल, वर्ल्ड कपमध्ये बनली नंबर 1

फोटो - @BCCIWomen

फोटो - @BCCIWomen

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup) शनिवारचा दिवस टीम इंडियासाठी खास ठरला. भारतीय टीमनं वेस्ट इंडिजचा (India Women vs West Indies Women) 155 रननं पराभव केला. अनुभवी बॉलर झुलन गोस्वामीनंही या मॅचमध्ये इतिहास रचला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च : महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup) शनिवारचा दिवस टीम इंडियासाठी खास ठरला. भारतीय टीमनं वेस्ट इंडिजचा (India Women vs West Indies Women) 155 रननं पराभव केला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी या मॅचमध्ये शतक झळकावले. या विजयासह टीम इंडियानं पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर झेप घेतली असून टीमच्या रनरेटमध्येही मोठी वाढ झाली आहे. भारताची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीनं  (Jhulan Goswami) या मॅचमध्ये एकच विकेट घेतली. पण, या विकेट्ससोबत  झूलननं वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 40 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. झूलननं वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदला आऊट करत हा रेकॉर्ड केला. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या लिन फुल्सटॉनच्या नावावर होता. तिने 1982 ते 1988 या कालावधीमध्ये 20 मॅचमध्ये 39 विकेट्स घेतल्या होत्या. झूलन 2005 सालापासून वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे. तिने 31 मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.

जाहिरात

झुलननं आजवर 198 वन-डेमध्ये 249 विकेट्स घेतल्या असून हा देखील एक रेकॉर्ड आहे. एकाच मॅचमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी तिने 2 वेळा केली आहे. आता वन-डे क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी तिला फक्त 1 विकेटची गरज आहे. भारताची पुढील मॅच  इंग्लंडविरूद्ध होणार असून या मॅचमध्ये झूलन हा रेकॉर्ड करू शकते. Women’s World Cup : भारताच्या मोठ्या विजयानंतर स्मृतीचा दिलदारपणा, आनंदाच्या क्षणी जिंकलं ‘हरमन’ दरम्यान भारताने दिलेलं 318 रनचं आव्हान वेस्ट इंडिजला पेलवलं नाही. दमदार सुरूवातीनंतरही त्यांची टीम 40.3 ओव्हर्समध्ये 162  रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून स्नेह राणानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंहला  2 विकेट्स मिळाल्या. राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकार आणि झूलन गोस्वामी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात