मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडियानं श्रीलंकेविरूद्धची टी20 सीरिज 3-0 या फरकानं जिंकली. भारतीय टीमनं तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 मॅचमध्ये 6 विकेट्सनं विजय मिळवला. मॅच संपल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली. सामान्यपणे कॅप्टन त्यानंतर टीममधील सर्वात नवीन खेळाडूच्या हातामध्ये ट्रॉफी सोपवतो. पण, यंदा मैदानात वेगळंच चित्र दिसलं. रोहित शर्मानं टीम इंडियाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये ट्रॉफी दिली. रोहितनं ट्रॉफी दिली ती व्यक्ती बीसीसीआयची प्रतिनिधी होती. जयदेव शहा (Jaydev Shah) असं त्यांचं नावं आहे. जयदेव सौराष्ट्राचे माजी कॅप्टन असून बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा यांचे चिरंजीव आहेत. जयदेव यांनी 120 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 29.91च्या सरासरीनं 5 हजार 354 रन केले. यामध्ये 10 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. जयदेव सध्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
टी-20 फॉरमॅटमधला टीम इंडियाचा हा लागोपाठ 12 वा विजय आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 ने, वेस्ट इंडिजला 3-0 ने आणि आता श्रीलंकेलाही 3-0 ने धूळ चारली. टी-20 फॉरमॅटमध्ये लागोपाठ सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे. याआधी अफगाणिस्ताननेही या फॉरमॅटमध्ये लागोपाठ 12 विजय मिळवले होते. रोहित शर्मासाठी KL Rahul चा सहकारी बनला डोकेदुखी, दर पाचव्या बॉलला करतो आऊट रविवारी झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 16.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 45 बॉलमध्ये 73 रनची नाबाद खेळी केली, तर रवींद्र जडेजाही 15 बॉलमध्ये 22 रनवर नाबाद राहिला. श्रीलंकेडकडून लाहिरु कुमाराला 2 विकेट मिळाल्या, तर दुष्मंता चमीरा आणि चमिका करुणारत्नेला 1 विकेट घेण्यात यश आलं.