मुंबई, 24 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वात जास्त टी20 इंटरनॅशनल मॅच खेळणारा खेळाडू बनला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या टी20 मॅचमध्ये (India vs Sri Lanka) त्याने हा रेकॉर्ड केला. रोहितची ती 125 वी मॅच होती. या मॅचमध्ये रोहितला बॅटनं कमाल करता आली नाही. तो फक्त 5 रन काढून आऊट झाला. त्याला फास्ट बॉलर दुष्मंथा चमीरानं (Dushmantha Chameera) आऊट केलं. रोहितचा चमीरा विरूद्धचा रेकॉर्ड चांगला नाही. त्याने दुसऱ्या मॅचमध्येही रोहितला बोल्ड केले होते. टी20 इंटरनॅशनलमध्ये चमीरानं रोहितला 30 बॉल टाकले आहेत. त्यामध्ये त्याने 6 वेळा रोहितला आऊट केलंय. याचाच अर्थ त्याने प्रत्येक पाचव्या बॉलला भारतीय कॅप्टनची विकेट घेतली आहे. या कालावधीमध्ये रोहितनं 32 रन केले आहेत. त्यामध्ये 4 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. तर एकूण 17 बॉल रोहितनं निर्धाव खेळले आहेत. आयपीएल 2022 साठी रोहितला केएल राहुल (KL Rahul) कॅप्टन असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स टीमनं खरेदी केले आहे. चमीराची बेस प्राईज 50 लाख होती. त्याला लखनऊनं (Lucknow Super Giants) 2 कोटींना खरेदी केले. चमीरानं टी20 करिअरमध्ये 88 मॅचमध्ये 89 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट 7.89 इतका आहे. तर श्रीलंकेकडून त्याने आजवर 12 टेस्ट, 39 वन-डे आणि 47 टी20 खेळल्या आहेत. भारतीय खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलीनंतर वडिलांचंही निधन! त्यानंतरही मॅच पूर्ण करण्याचं दाखवलं धैर्य रोहित शर्मा रविवारी लवकर आऊट झाला असला तरी त्याचा परिणाम मॅचच्या निकालावर झाला नाही. टीम इंडियाने 6 विकेटने ही मॅच जिंकली, याचसोबत भारताने ही सीरिजही 3-0 ने जिंकली आहे. श्रीलंकेने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 16.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 45 बॉलमध्ये 73 रनची नाबाद खेळी केली, तर रवींद्र जडेजाही 15 बॉलमध्ये 22 रनवर नाबाद राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







