जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : रोहित शर्मानं टॉस जिंकला, पाहा कुणी घेतली Playing11 मध्ये पुजारा आणि अजिंक्यची जागा

IND vs SL : रोहित शर्मानं टॉस जिंकला, पाहा कुणी घेतली Playing11 मध्ये पुजारा आणि अजिंक्यची जागा

IND vs SL : रोहित शर्मानं टॉस जिंकला, पाहा कुणी घेतली Playing11 मध्ये पुजारा आणि अजिंक्यची जागा

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिली टेस्ट मोहालीमध्ये सुरू झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टेस्ट करिअरमधील ही 100 वी टेस्ट आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मोहाली, 4 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिली टेस्ट मोहालीमध्ये सुरू झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टेस्ट करिअरमधील ही 100 वी टेस्ट आहे. तर रोहित शर्माचं (Rohit Sharma) कॅप्टन म्हणून या टेस्टमध्ये पदार्पण होत आहे. त्यामुळे भारतीय फॅन्सचं या टेस्टकडे लक्ष लागलंय. विराट कोहलीची 100 वी टेस्ट अधिक स्पेशल करण्याचा निर्धार कॅप्टन रोहित शर्मानं बोलून दाखवला आहे. ही टेस्ट जिंकून विराटला स्पेशल भेट देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कॅप्टन रोहित मोठ्या कालावधीनंतर टेस्ट मॅच खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला.अजिंक्य रहाणे (Ajikya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या अनुभवी खेळाडूंशिवाय टीम इंडिया मोठ्या कालावधीनंतर टेस्ट खेळत आहे. त्यांच्या जागी हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचा समावेश करण्यात आला आहे. अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनवर (R Ashwin) बॉल आणि बॅटसह चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. तर टीममधील दुसरा स्पिनर म्हणून रविंद्र जडेजाचा समावेश झाला आहे. तर जयंत यादव हा टीममधील तिसरा स्पिनर असेल जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी बॉलर्सवर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. श्रीलंकेची ही 300 वी टेस्ट मॅच आहे. आजवर श्रीलंकेला एकदाही भारतामध्ये टेस्ट मॅच जिंकता आलेली नाही. त्यांच्या टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे ही टीम चुरशीची होण्याची शक्यता आहे. Virat Kohli 100th Test : कॅप्टन रोहितनं सांगितलं त्याचं सर्वात जास्त आवडतं विराटचं शतक टीम इंडियाची Playing 11 : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, जयंत यादव,  मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात