जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli 100th Test : कॅप्टन रोहितनं सांगितलं त्याचं सर्वात जास्त आवडतं विराटचं शतक

Virat Kohli 100th Test : कॅप्टन रोहितनं सांगितलं त्याचं सर्वात जास्त आवडतं विराटचं शतक

Virat Kohli 100th Test : कॅप्टन रोहितनं सांगितलं त्याचं सर्वात जास्त आवडतं विराटचं शतक

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिली टेस्ट उद्या (शुक्रवार) मोहालीमध्ये सुरू होत आहे. विराट कोहलीच्या करिअरमधील ही 100 वी टेस्ट (Virat Kohli 100th Test) आहे. त्यानिमित्तानं कॅप्टन रोहित शर्मानं त्याला आवडणारी विराटची इनिंग सांगितली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिली टेस्ट उद्या (शुक्रवार) मोहालीमध्ये सुरू होत आहे. विराट कोहलीच्या करिअरमधील ही 100 वी टेस्ट (Virat Kohli 100th Test) आहे. या टेस्टमध्ये मोठी खेळी करून ती अधिक संस्मरणीय करण्याचा विराटचा प्रयत्न असेल. विराटनं गेल्या 2 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेलं नाही. त्यानं मोहालीमध्ये शतक झळकावलं तर तो रिकी पॉन्टिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल. पहिल्या टेस्टपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) विराटची जोरदार प्रशंसा केली. विराटसाठी हा प्रवास जबरदस्त होता. त्याच्या या ऐतिहासिक टेस्टला आणखी खास बनवण्याचा प्रयत्न असेल, असे रोहितने सांगितले. विराट कोहलीला श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली होती. तो या टेस्ट सीरिजमध्ये फ्रेश मुडमध्ये उतरणार आहे. रोहितनं यावेळी सांगितलं की, ‘विराटसाठी हा प्रवास जबरदस्त ठरला आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्यासाठी विशेष असलेली टेस्ट आणखी खास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. भारतीय कॅप्टनला यावेळी विराटच्या बेस्ट इनिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने 2013 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराटनं झळकावलेल्या शतकाचा उल्लेख केला. IND vs SL 1st Test : विराट कोहलीच्या 100 व्या टेस्टमध्ये अशी असेल टीम इंडियाची Playing11 ‘विराटनं एक बॅटर म्हणून 2013 साली दक्षिण आफ्रिकेत सर्वात संस्मरणीय इनिंग खेळली होती. तो आमच्या दोघांचाही पहिलाच दक्षिण आफ्रिका दौरा होता. आफ्रिकेकडे डेल स्टेन, फिनलँडर, मोर्ने मॉर्केल हे फास्ट बॉलर होते. त्यांच्या विरूद्ध विराटनं पहिल्या इनिंगमध्ये शतक लगावले होते. विराटनं 2018 साली पर्थमध्ये शतकी खेळी केली होती. पण, माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील इनिंग सर्वश्रेष्ठ आहे,’ असे रोहित यावेळी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात