मुंबई, 16 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातील संबंध सध्या ताणले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याचे आणि बीसीसीआयचे मतभेद सर्वांसमोर आले. विराटनं यावेळी बीसीसीआयनं केलेला दावा फेटाळला. त्यामुळे विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया गुरूवारी पहाटे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना (India vs South Africa) झाली. टीम इंडिया या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वन-डे खेळणार आहे. विराटनं यावेळी मुंबई विमानतळावर मुलगी वामिका (Vamika) बद्दल मीडियाला आवाहन केले. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहली टीमच्या बसमधून बाहेर पडला त्यावेळी तिथं मीडिया उपस्थित होता. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील यावेळी उपस्थित होती. विराटने मीडियाला वामिकाचे फोटो न काढण्याचे आवाहन केले.
यापूर्वी विराट कोहलीनं मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेद आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे सीरिज खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. या प्रकारचे वृत्त लिहिणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या सूत्रांनी तुम्ही हे प्रश्न विचारा. ही सर्व मंडळी विश्वासर्ह नाहीत. मी नेहमीच वन-डे सीरिजच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी देखील उपलब्ध होतो.’ या शब्दात विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे सीरिज खेळणार नसल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. IND vs SA : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना, BCCI च्या फोटोमधून विराट कोहली गायब निवड समितीने फक्त दीड तास आधी आपल्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात येणार असल्याचा खुलासा विराटने या पत्रकार परिषदेत केला आहे.‘मला निवड समितीच्या सदस्यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी संपर्क केला होता. त्यावेळी आम्ही टेस्ट टीमच्या निवडीबाबत चर्चा केली. त्यानंतर तू आता वन-डे टीमचा कॅप्टन नाहीस असे मला निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितले. मी तो निर्णय मान्य केला.’ असे विराटने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.