मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवातही भुवनेश्वर चमकला, 10 वर्षांनी केली रेकॉर्डची बरोबरी

IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवातही भुवनेश्वर चमकला, 10 वर्षांनी केली रेकॉर्डची बरोबरी

टीम इंडियाच्या या मालिकेतील निराशाजनक कामगिरीतही अनुभवी भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) चमकदार कामगिरी केली आहे.

टीम इंडियाच्या या मालिकेतील निराशाजनक कामगिरीतही अनुभवी भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) चमकदार कामगिरी केली आहे.

टीम इंडियाच्या या मालिकेतील निराशाजनक कामगिरीतही अनुभवी भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) चमकदार कामगिरी केली आहे.

मुंबई, 13 जून : दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचा संघर्ष सुरू आहे. या मालिकेतील (India vs South Africa T20 Series) पहिले दोन्ही सामने भारतीय टीमनं गमावले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय टीमनं दिलेलं 149 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. यापूर्वी दिल्लीतील सामन्यात 211  रनचं संरक्षण करण्यातही भारतीय बॉलर्स अपयशी ठरले होते.

टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीतही अनुभवी भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) चमकदार कामगिरी केली आहे. भुवनेश्वरनं रविवारी 'पॉवर प्ले' मध्ये तीन विकेट्स घेतल्या. त्यानं यावेळी त्याच्याच रेकॉर्डची पुनरावृत्ती केली आहे. यापूर्वी भुवीनं त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात 2012 साली पाकिस्तान विरूद्ध बेंगलुरूमध्ये 'पॉवर प्ले' मध्ये तीन विकेट्स घेतल्या होत्या.

भुवनेश्वरनं या मॅचमधील पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रिझा हेंड्रिक्सला आऊट केलं. तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर ड्वेन प्रिटोरीयसला कॅच आऊट केलं. तर पॉवर प्लेमधील शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं रस्सी व्हॅन डर डुसेनला बोल्ड करत तिसरी विकेट घेतली.  भुवनेश्वरनं संपूर्ण सामन्यात भेदक बॉलिंग करत एकाकी प्रयत्न केले. त्यानं 4 ओव्हरमध्ये 13 रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या एकाकी प्रयत्नाला अन्य बॉलरनं साथ दिली नाही.

IND vs SA : सलग 2 पराभवानंतर ऋषभ पंत आक्रमक, 'या' खेळाडूंना दिला इशारा

पॉवर प्लेमधील चांगल्या सुरूवातीचा फायदा टीम इंडियाच्या अन्य बॉलर्सना घेता आला नाही. टीम इंडियाचा पाचवा बॉलर महाग पडला. अक्षर पटेलनं एक ओव्हरमध्ये 19 रन दिले. हार्दिक पांड्यानं 3 ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं 31 रन दिले. लेग स्पिनर युजवेंद्र चहल तर आणखी महागडा ठरला. त्याच्या 4 ओव्हरमध्ये 49 रन निघाले.

First published:

Tags: Cricket news, South africa, Team india