मुंबई, 13 जून : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात (IND vs SA 2nd T20I) 4 विकेट्सनं पराभव झाला. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेनं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. कटकमधील बाराबाती स्टेडिअममध्ये रविवारी झालेल्या या सामन्यात भारतीय टीमनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 148 रन केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं 18.2 ओव्हर्समध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. या पराभवानंतर कॅप्टन पंतनं टीममधील सहकाऱ्यांना पुढील सामन्यांमध्ये चांगलं खेळण्याचा इशारा दिला आहे.
पंतनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, 'आम्ही 10-15 रन कमी केली. भूवी (भुवनेश्वर कुमार) आणि अन्य फास्ट बॉलर्सनी 7-8 ओव्हर्स चांगली बॉलिंग केली. त्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केली नाही. सेकंड हाफमध्ये विकेट हव्या होत्या. आम्हाला त्या विकेट्स मिळाल्या नाहीत. त्यांनी (क्लासनेन आणि बऊमा) यांची चांगली बॅटींग केली. आम्ही चांगली बॉलिंग करू शकलो असतो, आगामी तीन सामन्यांमध्ये आम्ही सुधारणा करू अशी आशा आहे. आम्हाला उर्वरित तीन सामने जिंकावेच लागतील.'
भारताने दिलेलं 149 रनचं आव्हान आफ्रिकेने 18.2 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं. हेनरिच क्लासिनने 46 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली, यात 7 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. याशिवाय कर्णधार टेम्बा बऊमाने 35 आणि डेव्हिड मिलरने नाबाद 20 रन केले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
सलमान खान स्टाईलमध्ये दिसला विराट कोहली, समुद्र किनाऱ्यावरील Hot Photo Viral
यापूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्यामुळे 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 0-2 ने पिछाडीवर आहे. आता सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी टीमला तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rishabh pant, South africa, Team india