मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: धोनीचा शिष्य होणार संकटमोचक, टीम इंडियात घेणार विराटची जागा!

IND vs SA: धोनीचा शिष्य होणार संकटमोचक, टीम इंडियात घेणार विराटची जागा!

भारतीय क्रिकेट टीम (Team India) दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच अडचणीत सापडली आहे. महेंद्रसिंह धोनीचा (MD Dhoni) शिष्य टीमचा संकटमोचक ठरणार असून तो विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेण्यासाठी सज्ज आहे.

मुंबई, 15 डिसेंबर :  भारतीय क्रिकेट टीम (Team India) दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच अडचणीत सापडली आहे. टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे टेस्ट सीरिज खेळणार नाही. वन-डे सीरिजमध्येही त्याचा सहभाग अनिश्चित आहे. त्यातच विराट कोहलीनेही (Virat Kohli) वन-डे सीरिजमधून माघार घेण्याची तयारी सुरू केली आहे. दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये वन-डे सीरिजमध्ये टीम इंडिया अडचणीत येणार आहे. अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाचा संकटमोचक महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) शिष्याचा पर्याय निवड समितीसमोर आहे.

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) खेळाडू आणि महाराष्ट्र क्रिकेट टीमचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रवास मंगळवारी संपला. पण, त्यापर्वी ऋतुराजने जबरदस्त कामगिरी करत वन-डे टीमसाठी दावेदारी सादर केली आहे.

यंदाच्या मोसमात ऋतुराजने सर्वाधिक 603 रन केले आहेत. यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे. त्याने पाच पैकी 4 मॅचमध्ये शतक झळकावले आहे. मंगळवारी झालेल्या महाराष्ट्राच्या शेवटच्या मॅचमध्ये ऋतुराजने 168 रनची खेळी केली. इतर कोणत्याही खेळाडूला 400 रनचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.

संपूर्ण स्पर्धेत त्याने 5 सामन्यांमध्ये 151 च्या सरासरीने 603 रन केले, यात 4 शतकं होती. तसंच त्याने 51 फोर आणि 19 सिक्स लगावले. या कारणांमुळे निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करणे भाग आहे. त्याने यापूर्वी आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 16 मॅचमध्ये 636 रन काढले होते.

विराट कोहली आज सोडणार मौन, भारतीय फॅन्सना मिळणार मोठ्या प्रश्नांची उत्तरं

ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नईचा ओपनर आहे. पण, त्याचबरोबर तो तिसऱ्या क्रमांकावरही बॅटींग करू शकतो. निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगरसकर यांनी या मुद्याकडे काही दिवसांपूर्वीच लक्ष वेधले होते. त्यामुळे विराटने वन-डे सीरिजमधून माघार घेतल्यास तीन नंबरवर खेळण्यासाठी निवड समिती ऋतुराजच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, MS Dhoni, Team india, Virat kohli