मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट कोहली आज सोडणार मौन, भारतीय फॅन्सना मिळणार मोठ्या प्रश्नांची उत्तरं

विराट कोहली आज सोडणार मौन, भारतीय फॅन्सना मिळणार मोठ्या प्रश्नांची उत्तरं

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडीचा केंद्रबिंदू असलेला टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) आज (बुधवार) या प्रश्नांवर मौन सोडावे लागणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. वन-डे टीमच्या कॅप्टनपदी विराट कोहलीला (Virat Kohli) हटवून रोहित शर्माला (Rohit Sharma) कॅप्टन करण्यात आले. या निर्णयावर विराट नाराज असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर तो दक्षिण आफ्रिका विरुद्धची वन-डे मालिका खेळणार नाही, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कारणांमुळे भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. फॅन्सचा हा गोंधळ आज (बुधवार) दूर होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटमधील या गोंधळाचा केंद्रबिंदू असलेला विराट या सर्व प्रश्नांवर अखेर मौन सोडण्याची शक्यता आहे. टीम इंडिया गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वी विराट कोहली मुंबईत आज (बुधवार) मीडियाला सामोरं जाणार असून त्यावेळी तो त्याच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असलेला विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे सीरिज खेळणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.  विराटला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ हवा आहे.वामिकाचा पहिला वाढदिवस 11 जानेवारी रोजी आहे. विराट टेस्ट सीरिजनंतर वामिकाचा वाढदिवस साजरी करण्यासाठी सुट्टीचं नियोजन करत आहे, असे वृत्त आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन-डे सीरिज 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या काळात विराट सुट्टीवर असेल, अशी चर्चा आहे. विराटने मात्र अद्याप या विषयावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

विराट-रोहितमध्ये वादाची ठिणगी, BCCI उचलणार मोठं पाऊल, टीम इंडियातली Inside Story

टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या प्रश्नावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पष्टीकरण दिले होते. आपण विराटला टी20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस, अशी विनंती केली होती, असे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले होते. विराट या विषयावर देखील उत्तर देण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि बीसीसीआय,  विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील संबंध सध्या कसे आहेत यावर विराटकडून उत्तरं मिळतील, अशी फॅन्सना आशा आहे.

First published:

Tags: Team india, Virat kohli