मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : टीम इंडियातील 3 जागांसाठी विराट-द्रविडला घ्यावे लागणार कठोर निर्णय

IND vs SA : टीम इंडियातील 3 जागांसाठी विराट-द्रविडला घ्यावे लागणार कठोर निर्णय

 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्टसाठी प्लेईंग 11 ची निवड करताना कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्टसाठी प्लेईंग 11 ची निवड करताना कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्टसाठी प्लेईंग 11 ची निवड करताना कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.

मुंबई, 24 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी सुरू होत आहे.सेंच्युरियनवर होणाऱ्या या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) प्लेईंग 11 ची निवड करताना कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. कॅप्टन विराटसह केएल राहुल, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह पहिली टेस्ट नक्की खेळतील. आर. अश्विन, मोहम्मद शमी, आणि चेतेश्वर पुजाराची जागा देखील नक्की मानली जात आहे. उर्वरित 3 जागांसाठी मात्र मोठी स्पर्धा आहे.

पाच बॉलर्स नक्की

टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या बॉक्सिंग डे नंतर 15 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. या सर्व टेस्टमधील प्लेईंग 11 मध्ये पाच बॉलर्सचा समावेश होता. यापैकी 13 टेस्टमध्ये रविंद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदर हे ऑल राऊंडर म्हणून खेळले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर हे दोघेही नाहीत. त्यामुळे टीम निवडताना त्रास होणार आहे. या परिस्थितीमध्ये रविचंद्रन अश्निनला सातव्या नंबरच्या बॅटरची भूमिका पार पाडावी लागेल.

टीम इंडिया पाच बॉलर्ससह मैदानात उतरली तर अश्विनसह शार्दुल ठाकूर देखील खेळेल. शार्दुलनं टेस्ट क्रिकेटमध्ये तीन अर्धशतक झळकावले आहेत. तो आठव्या नंबरवर बॅटींग करण्यासाठी योग्य आहे.

'... म्हणून अश्विनला त्रास झाल्याचा मला आनंद', रवी शास्त्रींचा अजब दावा

रहाणे-विहारी-अय्यरपैकी कोण?

टीम इंडियातील पाचव्या नंबरवरील बॅटरच्या जागेसाठी माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागे पडला आहे. रहाणेनं मागीलवर्षी मेलबर्न टेस्टमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 12 टेस्टमध्ये 19.57 च्या सरासरीनं रन केले आहेत. लॉर्ड्स टेस्टमधील विजयात रहाणेनं 61 रनचं महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण, त्यानंतरच्या 6 इनिंगमध्ये अनुक्रमे 18, 10, 14, 0, 35 आणि 4 रन काढले आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरचा दावा मजबूत आहे. अय्यरला मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियानं रहाणेच्या जागेवर पसंती दिली होती. तर विहारीनं नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पाचव्या क्रमांकावर विहारी किंवा अय्यर यापैकी एकाची निवड करण्याची शक्यता आहे. तर ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळेल.

IND vs SA: विराट कोहलीला मिळालं चॅलेंज, दक्षिण आफ्रिकन बॉलर घेणार कॅप्टनशी पंगा

इशांत की सिराज?

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची टीममधील जागा पक्की आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये त्यांना आराम देण्यात आला होता. तर तिसऱ्या फास्ट बॉलरच्या जागेसाठी इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्यात स्पर्धा आहे. अनुभवी इशांत शर्मानं यावर्षातील 8 टेस्टमध्ये फक्त 14 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई टेस्टपूर्वी तो जखमी झाला होता.

तर सिराजनं यावर्षी 10 टेस्टमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. नुकतीच सचिन तेंडुलकरनंही सिराजच्या बॉलिंगची प्रशंसा केली आहे. त्यामुळे इशांतपेक्षा सिराजचे पारडे जड आहे.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Virat kohli