मुंबई, 24 डिसेंबर : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ऑफ स्पिनर आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) उत्तर दिलं आहे. 'माझ्या बोलण्याचा अश्विनला त्रास झाला असेल तर ती चांगली गोष्ट आहे,' असा दावा शास्त्री यांनी केला आहे. शास्त्रींनी त्यामागील कारण देखील स्पष्ट केले आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' वरील 'ई अड्डा' कार्यक्रमात ते बोलत होते.
शास्त्री यावेळी म्हणाले की, 'अश्निन सिडनी टेस्टमध्ये खेळला नव्हता. कुलदीप यादवने चांगली बॉलिंग केली होती. त्यामुळे मी कुलदीपला संधी देणे योग्य होते. माझ्या वक्तव्याने अश्निनला त्रास झाला असेल तर मी खूप खूश आहे. त्यामुळे अश्विनला काही तरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळाली. टोस्टवर लोणी लावणे हे माझे काम नाही. कोणताही अजेंडा न ठेवता तथ्य समोर ठेवणे हे माझे काम आहे.
तुमचा कोच तुम्हाला आव्हान देत असेल तर तुम्ही काय करणार? मी आता परत कधीही येणार नाही, असं रडत घरी जाणार का? मी त्याच्या जागी असेल तर मी ते वक्तव्य एक आव्हान म्हणून स्वीकारेन आणि कोचला चुकीचा सिद्ध करेल.' असे शास्त्रींनी स्पष्ट केले.
काय म्हणाला होता अश्विन?
2019 साली सिडनी टेस्टदरम्यान तेव्हाचे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) परदेशात भारताचा नंबर एकचा स्पिनर असल्याचं वक्तव्य केलं होतं. शास्त्री यांच्या या वक्तव्यामुळे मला खूप त्रास झाला होता, असं स्पष्ट मत अश्विनने मांडलं होतं.
तेव्हा मला खूप त्रास झाला होता. आपल्या साथीदाराच्या यशाचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे, असं आपण सगळे बोलतो. मीदेखील कुलदीपसाठी खूश होतो. मी पाच विकेट मिळवू शकलो नाही, पण त्याला ऑस्ट्रेलियात पाच विकेट मिळाल्या. हे किती मोठं आहे, हे मला माहिती आहे. मी जेव्हा चांगली बॉलिंग केली तेव्हाही मला पाच विकेट मिळवता आल्या नाहीत.'
15 वर्ष खेळून थकला! बांगलादेशच्या अव्वल खेळाडूनं दिले निवृत्तीचे संकेत
कुलदीपच्या आणि टीमच्या यशाचा आनंद घेण्यासाठी पहिले मला टीमचा हिस्सा असल्यासारखं वाटलं पाहिजे. जर मला बसखाली फेकलं गेल्यासारखं वाटलं असेल, तर मी टीम आणि खेळाडूच्या यशाच्या पार्टीला कसा येऊ? तरीही मी टीम इंडियाने आयोजित केलेल्या पार्टीला गेलो, कारण भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टेस्ट सीरिज जिंकली होती,' असं अश्विननं सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, R ashwin, Ravi shashtri