मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: विराट कोहलीला मिळालं चॅलेंज, दक्षिण आफ्रिकन बॉलर घेणार कॅप्टनशी पंगा

IND vs SA: विराट कोहलीला मिळालं चॅलेंज, दक्षिण आफ्रिकन बॉलर घेणार कॅप्टनशी पंगा

 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरनं विराट कोहलीला (Virat Kohli) चॅलेंज दिले आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरनं विराट कोहलीला (Virat Kohli) चॅलेंज दिले आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरनं विराट कोहलीला (Virat Kohli) चॅलेंज दिले आहे.

मुंबई, 24 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशात होणारी ही सीरिज टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) महत्त्वाची आहे. विराटसाठी 2021 हे वर्ष साधरण गेलं आहे. त्याला या वर्षात एकही शतक झळकावता आलेलं नाही. त्याचबरोबर मैदानाच्या बाहेरही तो वादग्रस्त ठरला आहे. आता पहिल्या टेस्टपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डुआने ओलिव्हरनं (Duanne Oliver) विराटला चॅलेंज दिले आहे.

ओलिव्हरचं दोन वर्षानंतर दक्षिण आफ्रिका टीममध्ये पुनरागमन झालं आहे. विराटची विकेट घेऊन हे पुनरागमन आणखी संस्मरणीय करण्याचा निर्धार ओलिव्हरनं व्यक्त केला आहे. 29 वर्षांच्या ओलिव्हरनं 2017 साली पदार्पण केले होते. त्याने आजवर 10 टेस्टमध्ये 48 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यानंतर ओलिव्हरनं 2019 साली कोलपॅक कराराच्या अंतर्गत इंग्लंडमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता.  इंग्लंडमधील यॉर्कशर टीमकडून खेळल्यानंतर तो दोन वर्षांनी पुन्हा दक्षिण आफ्रिकेत परतला आहे. 'ही जागतिक स्तरावरील खेळाडूंच्या विरुद्ध माझ्या करिअरमधील सर्वात मोठी मालिका आहे. ही मालिका रंगतदार होणार आहे. मला विराट कोहलीला बॉलिंग करण्याची संधी मिळेल. हा खूप खास अनुभव आहे. कदाचित मी वर्ल्ड क्रिकेटमधील टॉप 4 बॅटर्सपैकी एकाला बॉलिंग करेल. माझ्यासाठी ही संधी आहे. माझ्यासाठी पहिला धक्का देत जोरदार सुरुवात करणे आवश्यक आहे, ' असे त्याने स्पष्ट केले.

IPL 2022 : 'या' टीमकडून नेहमी खेळण्याची तयारी, शुभमन गिलनं सांगितली चॉईस

दक्षिण आफ्रिकन टीम घरच्या परिस्थितीचा फायदा उठवू शकते, असं मत ओलिव्हरनं व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवशी मैदानात गवत नसेल, असा अंदाजही त्याने व्यक्त केला आहे. 'आम्हाला परिस्थितीचा फायदा उठवता आला पाहिजे. येथे बॉल चांगला सीम होतो, तसेच बाऊन्स देखील होतो. पिचवरील काही गवत कापले जाईल असा माझा अंदाज आहे. या टेस्टच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे, ही तयारीसाठी निराशाजनक गोष्ट आहे,' असे ओलिव्हरनं सांगितले.

First published:
top videos

    Tags: Cricket, South africa, Virat kohli