मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: गावसकरांनी दिली कॅप, द्रविडमुळे मिळाली संधी, मुंबईकर श्रेयसची पदार्पणातच बाजी

IND vs NZ: गावसकरांनी दिली कॅप, द्रविडमुळे मिळाली संधी, मुंबईकर श्रेयसची पदार्पणातच बाजी

मुंबईकर श्रेयस अय्यरनं पदार्पणातील टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. (फोटो -@BCCI)

मुंबईकर श्रेयस अय्यरनं पदार्पणातील टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. (फोटो -@BCCI)

मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे श्रेयसची ही पहिलीच टेस्ट आहे

  • Published by:  News18 Desk

कानपूर, 25 नोव्हेंबर: मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे श्रेयसची ही पहिलीच टेस्ट आहे. त्यानं पदार्पणातील टेस्टमधील पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक झळकावत टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) विश्वास सार्थ ठरवला आहे.

कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी लंचनंतर टीम इंडियाला दोन धक्के झटपट बसले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा लंचनंतर लगेच परतले. त्यावेळी कसोटीच्या क्षणी श्रेयसनं मैदानात पाऊल ठेवलं. त्यानंतर श्रेयसनं सुरूवातीला कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि नंतर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यासोबत महत्त्वाची पार्टनरशिप करत अर्धशतक झळकावले.

श्रेयस अय्यरला सकाळी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कॅप दिली. त्याचबरोबर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतरच्या पहिल्याच टेस्टमध्ये श्रेयसला पदार्पणाची संधी मिळाली. दिग्गज खेळाडूंनी ठेवलेला विश्वास श्रेयसनं सार्थ ठरवला आहे.

श्रेयसनं 94 बॉलमध्ये 6 चौकारासह त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्यानं रविंद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी महत्त्वाची पार्टनरशिप देखील केली आहे. श्रेयस आणि जडेजाच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियानं 200 रनचा टप्पा देखील पार केला आहे.

IND vs NZ: आधी दिलासा नंतर निराशा, 2 बॉलमध्ये बदललं रहाणेचं नशीब!

श्रेयसनं आजवर 92 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 52.18 च्या सरासरीनं 4592 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.तर 202 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.टीम इंडियाची मिडल ऑर्डर हा इंग्लंड दौऱ्यात चिंतेचा विषय  होता. मिडल ऑर्डरची ही चिंता दूर करण्यासाठी श्रेयसवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे यांनी विश्वास दाखवला होता. तो विश्वास श्रेयसनं पहिल्याच टेस्टमध्ये सार्थ ठरवला आहे.

First published:

Tags: Cricket news, Shreyas iyer, Team india