मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /India vs NZ 2nd Test Live Streaming: मुंबई टेस्ट कधी आणि कुठे पाहता येणार?

India vs NZ 2nd Test Live Streaming: मुंबई टेस्ट कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट आजपासून (शुक्रवार) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट आजपासून (शुक्रवार) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट आजपासून (शुक्रवार) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होत आहे.

मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट आजपासून (शुक्रवार) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होत आहे. या सीरिजमधील कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यामुळे दोन्ही टीमसाठी ही टेस्ट निर्णायक आहे. मुंबईत तब्बल 5 वर्षांनी टेस्ट मॅच होत असून या टेस्टची उत्सुकता मुंबईकरांमध्ये शिगेला पोहचली आहे.

या टेस्टसाठी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन करत आहे. कोहलीनं टी20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक घेतला होता. मुंबईतील या टेस्टला खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये सतत पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या प्रॅक्टीसलाही याचा फटका बसला आहे. शुक्रवारी देखील पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट किती वाजता सुरू होणार आणि ती कुठे पाहता येईल ते पाहूया

किती वाजता सुरू होणार मॅच?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरी टेस्ट  3 डिसेंबर रोजी शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी  9.30  वाजता सुरू होणार आहे. तर टॉस सकाळी 9 वाजता होईल.

कुठे होणार लाईव्ह प्रसारण?

या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

IND vs NZ: टीम इंडियांच्या स्वप्नांवर पावसाचं पाणी! मुंबईतील हवामानामुळे दुसरी टेस्ट संकटात 

दोन्ही देशांच्या टीम

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रीकर भरत आणि प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंडची टीम : केन विलियमसन (कॅप्टन), टॉम लॅथम, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, विल यंग, हेनरी निकोलस, ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, नील वॅगनर, डेरेल मिचेल, काइल जेमिसन, एयाज पटेल, मिचेल सँटनर, विल्यम सोमरविले आणि रचिन रवींद्र.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india