कानपूर, 26 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) या टेस्टमध्ये पदार्पण केले. श्रेयसनं टेस्ट पदार्पणातच शतक झळकावले आहे. पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणारा श्रेयस हा भारताचा 16 वा बॅटर आहे. शतक झळकावल्यानंतर लगेच श्रेयस आऊट झाला. 105 रनची खेळी टीम साऊदीनं (Tim Southee) संपुष्टात आणली.
श्रेयसच्या या शतकामुळे टीम मॅनेजमेंटसमोरची चिंता वाढली आहे. कानपूर टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दिग्गज बॅटर्सना विश्रांती देण्यात आली आहे. यापैकी विराट मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये परतणार आहे. विराट टीममध्ये परतल्यानंतर प्लेईंग 11 मधील कोणत्या बॅटरला बाहेर करायचे या मोठ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधावे लागणार आहे.
A special moment for @ShreyasIyer15 💯
Live - https://t.co/9kh8Df6cv9 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/HA7yJiB1Hg — BCCI (@BCCI) November 26, 2021
श्रेयस अय्यर मिडल ऑर्डरचा बॅटर आहे. त्यामुळे मुंबई टेस्टमध्यो ओपनिंग जोडीमध्ये कोणताही बदल होणार नाही, हे स्पष्ट आहे. विराट कोहली परतल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये बदल होणार आहे. चेतेश्वर पुजारा नंबर 3, विराट कोहली नंबर 4 आणि अजिंक्य रहाणे नंबर 5 अशी टीम इंडियाची टेस्टमधील बॅटींग ऑर्डर बऱ्याच वर्षांपासून आहे.
IND vs NZ: गावसकरांकडून कॅप घेणाऱ्या श्रेयसनं केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी
टीम इंडियाच्या या मिडल ऑर्डरमध्ये आता श्रेयसची एन्ट्री झाली आहे. कानपूर टेस्टमध्ये शतक झळकावल्यानं तो मुंबईत खेळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे श्रेयसला खेळवण्यासाठी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्गजांपैकी कुणाला बाहेर करणार? या अवघड प्रश्नाचे उत्तर कॅप्टन विराट आणि कोच द्रविडला शोधावे लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Shreyas iyer, Team india, Virat kohli