मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: गावसकरांकडून कॅप घेणाऱ्या श्रेयसनं केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी

IND vs NZ: गावसकरांकडून कॅप घेणाऱ्या श्रेयसनं केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी

मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्ये शतक झळकावले आहे. श्रेयसनं कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं पदार्पणातच ही कामगिरी केली आहे

मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्ये शतक झळकावले आहे. श्रेयसनं कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं पदार्पणातच ही कामगिरी केली आहे

मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्ये शतक झळकावले आहे. श्रेयसनं कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं पदार्पणातच ही कामगिरी केली आहे

कानपूर, 26 नोव्हेंबर: मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्ये शतक झळकावले आहे. श्रेयसनं कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं पदार्पणातच ही कामगिरी केली आहे. पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावणारा श्रेयस हा 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Shreyas Iyer) यांनी  श्रेयसला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करताना कॅप दिली होती. विशेष म्हणजे श्रेयसनं कानपूरच्या मैदानात त्यांचे मेव्हणे आणि दिग्गज क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Vishwanath) यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. गुंडप्पा यांनी 1969 साली कानपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केले होते. त्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच त्यांनी शतक झळकाले होते.

श्रेयस पहिल्या दिवशी 75 रनवर नाबाद होता. त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी सकारात्मक खेळ करत शतक पूर्ण केले आहे. दुसऱ्या दिवसी सकाळी रविंद्र जडेजा झटपट आऊट झाला. पहिल्या दिवशी 50 रनवर खेळणाऱ्या जडेजाला दुसऱ्या दिवशी एकही रन करता आला नाही. त्याला टीम साऊदीनं (Tim Southee) आऊट केलं. श्रेयस आणि जडेजानं पाचव्या विकेटसाठी 121 रनची पार्टनरशिप केली. जडेजा आऊट झाल्यानंतरही श्रेयसनं खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता शतक पूर्ण केले.

IND vs NZ: श्रेयस अय्यरच्या वडिलांनी 4 वर्ष बदलला नाही WhatsApp DP, समोर आलं भावुक कारण

श्रेयसनं टेस्ट कारकिर्दीमधील पहिले शतक 157 बॉलमध्ये पूर्ण केले. या खेळीत त्यानं 12 फोर आणि 2 सिक्स लगावले. पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावत  लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, मोहम्मद अझहरुद्दीन, प्रवीण आम्रे, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ या बॅटर्सच्या यादीत श्रेयसनं जागा मिळवली आहे.

First published:

Tags: Cricket, Shreyas iyer