मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : राहुल द्रविडमुळे टीम इंडियात आनंदाचं वातावरण, स्टार खेळाडूनं सांगितलं कारण

IND vs NZ : राहुल द्रविडमुळे टीम इंडियात आनंदाचं वातावरण, स्टार खेळाडूनं सांगितलं कारण

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) आता भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे.  अनुभवी द्रविडच्या टीम इंडियातील आगमनामुळे भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) आता भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात जयपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टी20 मॅचपासून त्याची नवी इनिंग सुरू होईल. अनुभवी द्रविडच्या टीम इंडियातील आगमनामुळे भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. द्रविडची खासियत काय आहे, याचं रहस्य टीम इंडियाच्या स्टार बॅटरनं सांगितलं आहे.

राहुल द्रविड यापूर्वी टीम इंडिया A टीमचा कोच होता. त्या टीमचा मयांक अग्रवाल (Mayank Agarwal)  सदस्य होता. आता मयांक पुन्हा एकदा द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याबद्दल भलताच खूश झाला आहे. 'राहुल भाई टीम इंडियाचे कोच होते. त्यावेळी त्यांचा अनुभव खूपच चांगला होता. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. टीम इंडियात त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे.

'मला काही विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायची आहे. द्रविडशी संपर्क साधणे खूप सोपं आहे. ते यापूर्वी टीम इंडिया A चे सदस्य होते. त्यावेळी आम्ही थेट फोनवर बोलत असू आणि मनातील गोष्टी त्यांच्याशी शेअर करत असू. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमधील टीमचा सदस्य बनण्यासाठी मी उत्सुक आहे. आयपीएलमध्ये माझी कामगिरी चांगली झाली. मी टीमच्या गरजेप्रमाणे खेळ केला.' असं मयांकनं यावेळी सांगितलं.

IND vs NZ : स्वत:पेक्षा 'या' खेळाडूच्या निवडीवर जास्त खूश झाला अय्यर

मयांकनं आजवर 14 टेस्टमध्ये 1052 रन काढले आहेत. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टपूर्वी त्याला दुखापत झाली होती. त्यावेळी मयांकच्या जागी राहुलची टीम इंडियात निवड झाली. राहुलनं त्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यानं मयांकला संधी मिळाली नाही. आता न्यूझीलंड विरुद्धच्या दोन टेस्टवर त्याचं लक्ष आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट कानपूरमध्ये 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर दुसरी टेस्ट मुंबईत होईल.

First published:

Tags: Rahul dravid, Team india